ब्रह्मपुत्रा व्हॅली फर्टिलायझर कॉर्पोरेशन लिमिटेड (बीव्हीएफसीएल), नामरुप,आसामच्या सध्याच्या संकुलात एका नव्या ब्राऊनफिल्ड अमोनिया-युरिया कॉम्प्लेक्स नामरुप IV खत कारखान्याची उभारणी करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

March 19th, 04:09 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने आज ब्रह्मपुत्रा व्हॅली फर्टिलायझर कॉर्पोरेशन लिमिटेड (बीव्हीएफसीएल), नामरुप, आसामच्या सध्याच्या संकुलात युरियाचे वार्षिक 12.7 लाख मेट्रिक टन (एलएमटी ) इतकी उत्पादनक्षमता असलेल्या एका नव्या ब्राऊनफिल्ड अमोनिया-युरिया कॉम्प्लेक्स उभारणी ला मंजुरी दिली. या कारखान्यासाठी नवे गुंतवणूक धोरण, 2012 अंतर्गत, 7 ऑक्टोबर 2014 रोजी केलेल्या सुधारणांसह 70:30 या ऋण इक्विटी प्रमाणासह एका संयुक्त प्रकल्पाच्या माध्यमातून अंदाजे 10,601.40 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. नामरुप- IV प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी एकूण कालमर्यादा 48 महिने आहे.