रेडिओवरील प्रसिद्ध व्यक्तिमत्व अमीन सयानी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दुःख
February 21st, 01:02 pm
रेडिओवरील प्रसिद्ध व्यक्तिमत्व अमीन सयानी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. अमीन सयानी जी यांनी भारताच्या प्रसारण क्षेत्रात क्रांती घडवून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे आणि त्यांच्या कार्याद्वारे त्यांनी श्रोत्यांशी एक अतिशय खास स्नेहबंध जोपासला आहे, असे मोदी यांनी म्हटले आहे.