Prime Minister attends Raisina Dialogue 2026

March 05th, 08:31 pm

PM Modi today attended the Raisina Dialogue 2026 in New Delhi. In a post on X, the PM said he listened to the insightful address by Finland President Alexander Stubb, in which he covered a wide range of subjects.

फिनलंड प्रजासत्ताकाचे राष्ट्रपती यांच्या भारत भेटीबाबत भारत-फिनलंड संयुक्त निवेदन

March 05th, 08:03 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून, फिनलंड प्रजासत्ताकाचे राष्ट्रपती डॉ. अलेक्झांडर स्टब 4 ते 7 मार्च 2026 दरम्यान भारताच्या राजकीय दौऱ्यावर आले आहेत. आपल्या विद्यमान पदावर कार्यरत असताना राष्ट्रपती स्टब हे प्रथमच भारत दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात ते नवी दिल्ली आणि मुंबईला भेट देत आहेत. त्यांच्यासोबत फिनलंडच्या हवामान आणि पर्यावरण मंत्री सारी मुलताला, फिनलंडचे रोजगार मंत्री मतियास मार्टिनेन तसेच अनेक अधिकारी आणि उद्योग क्षेत्रातील नेत्यांचा समावेश असलेले उच्चस्तरीय शिष्टमंडळ आहे. पंतप्रधान मोदी यांनी 5 मार्च 2026 रोजी नवी दिल्ली येथे 11 व्या रायसीना संवादाचे उद्घाटन केले. या कार्यक्रमात फिनलँड चे राष्ट्रपती स्टब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते आणि त्यांनी उद्घाटनप्रसंगी मुख्य भाषण दिले. फेब्रुवारी 2026 मध्ये झालेल्या एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेसाठी फिनलंड प्रजासत्ताकाचे पंतप्रधान पेटेरी ओर्पो यांच्या भारत भेटीनंतर राष्ट्रपती स्टब यांचा हा दौरा होत आहे.

फिनलँडच्या राष्ट्रपतींसोबतच्या संयुक्त निवेदनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले निवेदन

March 05th, 11:55 am

फिनलँडचे राष्ट्रपती म्हणून आपल्या पहिल्या भारत दौऱ्यावर आलेल्या राष्ट्रपती स्टुब्ब यांचे मी मनापासून स्वागत करतो. राष्ट्रपती स्टुब्ब हे केवळ एक प्रसिद्ध जागतिक नेतेच नाहीत, तर ते एक सन्माननीय विचारवंत आणि लेखक देखील आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या दौऱ्यावर आलेले फिनलंडचे अध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांचे स्वागत केले

March 04th, 12:04 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारताच्या दौऱ्यावर असलेले फिनलंड प्रजासत्ताकाचे अध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांचे स्वागत केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांनी दूरध्वनीवरून साधला संवाद

August 27th, 08:32 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आज फिनलंड प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांनी दूरध्वनीवरून संवाद साधला.

फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनी द्वारे संपर्क साधला

April 16th, 05:45 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फिनलँड चे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांच्याशी दूरध्वनी द्वारे संवाद साधला.