भारत-कॅनडा मुख्य कार्यकारी अधिकारी परिषदेतील पंतप्रधानांच्या सीईओ फोरम मधील भाषणाचा मजकूर
March 02nd, 02:30 pm
आज आपण भारत-कॅनडा संबंधांमध्ये एक नवीन अध्याय लिहिणार आहोत. पंतप्रधान कार्नी यांचा एक वर्षाचाही कार्यकाळ पूर्ण झालेला नाही, परंतु आपल्या संबंधांनी जणू एका प्रकाशवर्षाची झेप घेतली आहे. गेल्या काही महिन्यांत विश्वास वाढला आहे, स्पष्टता आली आहे आणि नवीन गती निर्माण झाली आहे. हे सर्व त्या काळात घडत आहे, जेव्हा जग आर्थिक अनिश्चिततेच्या टप्प्यातून जात आहे आणि जागतिक आर्थिक व्यवस्था दबावाखाली आहे. अशा वेळी भारत आणि कॅनडातील व्यावसायिक नेत्यांचे हे चिंतन आपल्या भागीदारीचा नवीन आराखडा तयार करेल. आपणा सर्वांच्या दृष्टीकोन आणि बांधिलकीचे मी अभिनंदन करतो.जी 7 शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी आणि कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांची भेट
June 18th, 08:02 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज अल्बर्टामधील कनानास्किस येथे जी 7 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्याबरोबर द्विपक्षीय बैठक झाली