नवी दिल्लीत संपन्न होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाप्रसंगी पंतप्रधानांचे संबोधन
February 21st, 05:00 pm
संमेलनामध्ये उपस्थित ज्येष्ठ नेते श्री. शरद पवार, महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर, माजी अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, सर्व सदस्य आणि मराठी भाषेचे सर्व विद्वत्तजन आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन
February 21st, 04:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन केले. याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या मराठी भाषेच्या या भव्य सोहोळ्यात सर्व मराठी भाषिकांचे स्वागत केले. ते म्हणाले की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणतीही भाषा अथवा प्रदेशापुरते सीमित नाही. ते पुढे म्हणाले की या संमेलनात महाराष्ट्र आणि देशाच्या स्वातंत्र्य चळवळीचे सार तसेच सांस्कृतिक वारसा अंतर्भूत आहे.दिल्ली येथे आयोजित 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 फेब्रुवारी रोजी करणार
February 20th, 07:30 pm
मराठीला अलिकडेच सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. मराठी भाषेच्या गौरवाचा आणखी एक भाग म्हणून आणि भारताच्या समृद्ध संस्कृती आणि वारशाचे कौतुक म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 फेब्रुवारी रोजी दुपारी 4:30 वाजता नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन करतील. याप्रसंगी ते उपस्थितांना संबोधितही करतील.