मन की बात’ हे देशातील लोकांच्या सामुहिक प्रयत्नांना सामान्य जनतेसमोर आणणारं एक उत्तम व्यासपीठ : पंतप्रधान मोदी
November 30th, 11:30 am
या महिन्याच्या मन की बातमध्ये, पंतप्रधान मोदींनी संविधान दिन सोहळा, वंदे मातरम गीताचा 150 वा वर्धापन दिन, अयोध्येत धर्मध्वजारोहण, आयएनएस 'माहे'चा नौदलात समावेश आणि कुरुक्षेत्र येथे झालेला आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव यासह नोव्हेंबरमध्ये पार पडलेल्या महत्त्वाच्या कार्यक्रमांवर प्रकाश टाकला. देशात यंदा झालेले अन्नधान्याचे आणि मधाचे विक्रमी उत्पादन, भारताचे क्रीडा क्षेत्रातील यश, संग्रहालये आणि नैसर्गिक शेती अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांनाही त्यांनी स्पर्श केला. पंतप्रधानांनी सर्वांना काशी-तमिळ संगमचा भाग होण्याचेही आवाहन केले.हैदराबादमधील सफ्रान एअरक्राफ्ट इंजिन सर्व्हिसेस इंडिया सुविधेच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांच्या भाषणाचा मराठी अनुवाद
November 26th, 10:10 am
“भारताचे नागरी विमान वाहतूक मंत्री के. राम मोहन नायडू जी, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी जी, सफ्रान समूहाशी संबंधित सर्व मान्यवर, आणि उपस्थित बंधू-भगिनींनो!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबाद येथील सफ्रान एअरक्राफ्ट इंजिन सर्व्हिसेस इंडिया सुविधेचे दूरदृश्य प्रणालीद्वारे केले उद्घाटन
November 26th, 10:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील, जीएमआर एरोस्पेस अँड इंडस्ट्रियल पार्क - सेझ, येथील सफ्रान एअरक्राफ्ट इंजिन सर्व्हिसेस इंडिया (एसएईएसआय) सुविधेचे उद्घाटन केले. आजपासून भारताचे हवाई वाहतूक क्षेत्र नवीन भरारी घेण्यासाठी सज्ज झाले आहे, सफ्रानच्या या नव्या सुविधेमुळे भारत जागतिक एमआरओ अर्थात देखभाल, दुरुस्ती आणि संधारण केंद्र म्हणून उदयाला येईल, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. हे देखभाल, दुरुस्ती आणि संधारण सुविधा केंद्र युवकांसाठी उच्च तंत्रज्ञानाधारित हवाई वाहतूक क्षेत्रात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करेल, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. आपण 24 नोव्हेंबर रोजी सफ्रानच्या संचालक मंडळ आणि व्यवस्थापनाशी संवाद साधला होता आणि त्यांच्याबरोबर याआधीही झालेल्या चर्चेत भारताबद्दलचा त्यांचा विश्वास आणि आशा दिसून आली होती, असे पंतप्रधान म्हणाले. सफ्रानची भारतातील गुंतवणूक देखील त्याच गतीने कायम राहील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पंतप्रधानांची सफ्रानच्या टीमचे नवीन सुविधेबद्दल अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.आगामी दशकासाठी भारत-जपान संयुक्त दृष्टिकोन: विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीसाठी आठ दिशानिर्देश
August 29th, 07:11 pm
भारत आणि जपान; मुक्त, खुला, शांत, समृद्ध आणि दडपशाहीमुक्त हिंद-प्रशांत प्रदेशाचा कायद्याच्या नियमांवर आधारित समान दृष्टिकोन असलेले दोन देश, पूरक संसाधन देणग्या, तांत्रिक क्षमता आणि किफायतशीर स्पर्धात्मकता असलेल्या दोन अर्थव्यवस्था तसेच मैत्री आणि परस्पर सद्भावनेची दीर्घ परंपरा असलेली दोन राष्ट्रे म्हणून पुढील दशकात आपल्या देशांमध्ये आणि जगात मोठ्या प्रमाणात बदल आणि संधी एकत्रितपणे वहन करण्याचा, आपली संबंधित देशांतर्गत उद्दिष्टे साध्य करण्यात मदत करण्याचा तसेच आपल्या देशांना आणि पुढच्या पिढीतील लोकांना पूर्वीपेक्षा जास्त जवळ आणण्याचा आपला हेतू याद्वारे व्यक्त करीत आहेत.नवी दिल्लीत भारत मंडपम इथे जागतिक हवाई वाहतूक परिषदेच्या पूर्ण सत्रामध्ये पंतप्रधानांनी केलेले संबोधन
June 02nd, 05:34 pm
आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेच्या 81 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आणि जागतिक हवाई वाहतूक परिषदेत आपणा सर्व अतिथींचे मी भारतात स्वागत करतो, आपले अभिनंदन करतो. 4 दशकानंतर हा कार्यक्रम भारतात होत आहे. या 4 दशकात भारतात मोठे परिवर्तन झाले आहे. आजचा भारत पूर्वीपेक्षा अनेक पटीने आत्मविश्वासाने परिपूर्ण आहे. जागतिक हवाई परिसंस्थेत आम्ही केवळ एक मोठी बाजारपेठ नव्हे तर धोरण नेतृत्व, नवोन्मेश आणि समावेशक विकासाचे प्रतीकही आहोत. जागतिक अंतराळ-हवाई वाहतूक या एकत्रित क्षेत्रात भारत आज उगवते नेतृत्व आहे. गेल्या एका दशकातली भारताची नागरी हवाई वाहतूक क्षेत्रातली झेप सर्व परिचित आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेच्या 81व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला आणि जागतिक हवाई वाहतूक परिषदेच्या पूर्ण सत्राला केले संबोधित
June 02nd, 05:00 pm
जागतिक दर्जाची हवाई पायाभूत सुविधा विकसित करण्याच्या आणि संपर्कव्यवस्था वाढवण्याच्या आपल्या वचनबद्धतेला अनुसरत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेच्या (IATA) 81 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला आणि जागतिक हवाई वाहतूक परिषदेच्या (WATS) पूर्ण सत्राला संबोधित केले. या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधानांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि चार दशकांनंतर हा कार्यक्रम भारतात होत असल्याचे महत्त्व अधोरेखित केले. या काळात भारतामध्ये झालेल्या परिवर्तनीय बदलांवर त्यांनी भर दिला, आणि आजचा भारत पूर्वीपेक्षा अधिक जास्त आत्मविश्वासाने युक्त असल्याचे नमूद केले.भारत केवळ एक मोठी बाजारपेठ नसून, धोरणात्मक नेतृत्व, नवनिर्मिती आणि सर्वसमावेशक विकासाचे प्रतीक असल्याचे सांगत त्यांनी हवाई वाहतुकीच्या जागतिक परिसंस्थेत भारताच्या भूमिकेला अधोरेखित केले. आज भारत अवकाश-विमान वाहतुकीच्या एकत्रिकरणामध्ये जागतिक नेता म्हणून उदयास येत आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. गेल्या दशकात नागरी विमान वाहतूक क्षेत्रात ऐतिहासिक प्रगती झाली आहे, जे सर्वांनाच ज्ञात असल्याचेही त्यांनी सांगितले.आदमपूर हवाई तळावर पंतप्रधानांनी शूर हवाई योद्धे आणि सैनिकांशी साधलेला संवाद
May 13th, 03:45 pm
या जयघोषाचे सामर्थ्य नुकतेच जगाने पाहिले आहे. भारत माता की जय हा केवळ जयघोष नव्हे तर भारत मातेची प्रतिष्ठा राखण्यासाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या देशाच्या प्रत्येक सैनिकाची ही शपथ आहे.देशासाठी काही करू इच्छिणाऱ्या, देशहितासाठी जगणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा हा आवाज आहे. भारता माता की जय हा जयजयकार मैदानातही घुमतो आणि मोहिमांमधेही. भारतीय सैनिक जेव्हा भारत मातेचा जयजयकार करतात तेव्हा शत्रूचाही थरकाप उडतो.जेव्हा आपली ड्रोन्स, शत्रूची तटबंदी ढासळवतात, जेव्हा सणसणत जाणारी आपली क्षेपणास्त्रे अचूक लक्ष्यभेद करतात तेव्हा शत्रूला ऐकू येतो भारत मातेचा जयजयकार ! जेव्हा रात्रीच्या अंधारातही आम्ही सूर्याप्रमाणे लखलखीत उजेड करणारी कामगिरी करतो तेव्हा शत्रूसमोर तरळतो भारत मातेचा जयजयकार. शत्रूची अण्वस्त्रांची धमकी जेव्हा आपली सैन्यदले पोकळ ठरवितात तेव्हा आकाशापासून पाताळापर्यंत एकच जयजयकार दुमदुमतो-भारत माता की जय!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शूर हवाई योद्धे आणि सैनिकांशी साधला संवाद
May 13th, 03:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आदमपूर येथील हवाई तळाला भेट दिली आणि या तळावरील शूर हवाई योद्धे आणि सैनिकांशी संवाद साधला.त्यांना संबोधित करताना, त्यांनी 'भारत माता की जय' या जयघोषाचे सामर्थ्य अधोरेखित केले. जगाने नुकतेच याचे सामर्थ्य अनुभवले आहे यावर त्यांनी भर दिला. हा केवळ जयजयकार नसून, भारतमातेची प्रतिष्ठा जपण्यासाठी आपले प्राण पणाला लावणाऱ्या प्रत्येक सैनिकाची ही एक पवित्र शपथ आहे, असे पंतप्रधान म्हणाले. ही घोषणा म्हणजे, राष्ट्रहितासाठी जगण्याची आणि अर्थपूर्ण योगदान देण्याची इच्छा असलेल्या प्रत्येक नागरिकाचा आवाज आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले.‘भारत माता की जय’ हा जयघोष युद्धभूमी आणि महत्त्वाच्या मोहिमा अशा दोन्ही ठिकाणी घुमतो, असे त्यांनी अधोरेखित केले. ते म्हणाले की जेव्हा भारतीय सैनिक ‘भारत माता की जय’ चा जयघोष करतात, तेव्हा शत्रूच्या मनात धडकी भरते. त्यांनी भारताच्या लष्करी सामर्थ्यावर भर दिला आणि सांगितले की जेव्हा भारतीय ड्रोन शत्रूच्या तटबंदी उद्ध्वस्त करतात आणि क्षेपणास्त्रे अचूकतेने हल्ला करतात, तेव्हा शत्रूला फक्त एकच वाक्य ऐकू येते—‘भारत माता की जय’. पंतप्रधान मोदींनी ठामपणे सांगितले की अंधाऱ्या रात्रीतही, भारताकडे आकाश उजळून टाकण्याची क्षमता आहे, ज्यामुळे शत्रूला देशाच्या अदम्य भावनेचे दर्शन घडते. त्यांनी सांगितले की ज्यावेळी भारताचे सैन्य अणुबॉम्बच्या धमक्या मोडून काढते, तेव्हा आकाशात आणि पाताळात एकच संदेश घुमतो—‘भारत माता की जय’!NXT कॉन्क्लेवमध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण
March 01st, 11:00 am
NewsX World याची शुभ सुरुवात आणि यासाठी मी तुम्हा सर्वांचे खूप-खूप अभिनंदन करतो, खूप-खूप शुभेच्छा देतो. तुमच्या नेटवर्कमधील हिंदी आणि इंग्रजीसहित सर्व प्रादेशिक वाहिन्या आज तुम्ही ग्लोबल होत आहात आणि आज अनेक fellowships आणि scholarship ची देखील सुरुवात झाली आहे. मी या कार्यक्रमांसाठी तुम्हा सर्वांना खूप-खूप शुभेच्छा देतो.NXT Conclave या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सहभाग
March 01st, 10:34 am
नवी दिल्ली मधील भारत मंडपम इथे आजपासून NXT Conclave या परिषदेला सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज या परिषदेत सहभागी झाले. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधितही केले. यावेळी त्यांनी NewsX World या माध्यम समुहाच्या शुभारंभाबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदनही केले. या माध्यम समुहात हिंदी, इंग्रजी आणि विविध प्रादेशिक भाषांमधील वाहिन्यांचा समावेश असून, या समूहाने आज जागतिक समूह होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली असल्याची बाबही त्यांनी अधोरेखित केली. या समुहाने अनेक पाठ्यवृत्ती आणि शिष्यवृत्ती कार्यक्रम सुरु केला असल्याचे सांगून या कार्यक्रमांसाठी त्यांनी शुभेच्छाही दिल्या.आयएनएस सुरत,आयएनएस निलगिरी आणि आयएनएस वाघशीर यांचा नौदलात समावेश करण्याप्रसंगी पंतप्रधानांचे संबोधन
January 15th, 11:08 am
महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन जी, महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, मंत्रिमंडळातले माझे वरिष्ठ सहकारी राजनाथ सिंह जी, संजय सेठ जी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, त्यांच्यासमवेत आज दोन्ही उपमुख्यमंत्रीही आहेत,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी, अजीत पवार जी, सीडीएस,सीएनएस, नौदलाचे सर्व सहकारी, माझगाव गोदी मध्ये काम करणारे सर्व सहकारी, इतर अतिथी वर्ग,महिला आणि पुरुष वर्ग,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आय एन एस सुरत, आय एन एस निलगिरी आणि आय एन एस वाघशीर या प्रमुख युद्धनौकांचे (एक लढाऊ जहाज, एक विनाशिका आणि एक पाणबुडी) राष्ट्रार्पण
January 15th, 10:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबईत नौदल डॉकयार्ड येथे नौदलाच्या तीन आघाडीच्या युद्धनौका, आय एन एस सुरत, आय एन एस निलगिरी आणि आय एन एस वाघशीर यांचे राष्ट्रार्पण करण्यात आले. 15 जानेवारी हा दिवस लष्कर दिन म्हणून साजरा केला जातो असे सांगून पंतप्रधानांनी देशाच्या सुरक्षेसाठी सर्वोच्च बलिदान करणाऱ्या शूर वीरांना अभिवादन केले.त्यांनी सर्व शूर सैनिकांचे अभिनंदन केले.Prime Minister Narendra Modi to visit Gujarat
October 26th, 03:28 pm
PM Modi will visit Gujarat on 28th October. The Prime Minister, along with the President of the Government of Spain, Mr. Pedro Sanchez, will jointly inaugurate the TATA Aircraft Complex for manufacturing C-295 aircraft at TATA advanced systems limited (TASL) Campus. Thereafter, PM Modi will visit Laxmi Vilas Palace, Vadodara. From Vadodara, the PM will travel to Amreli where he will inaugurate Bharat Mata Sarovar at Dudhala. Further, he will inaugurate and lay the foundation stone of various development projects worth over Rs 4,800 crores at Lathi, Amreli.Joint Fact Sheet: The United States and India Continue to Expand Comprehensive and Global Strategic Partnership
September 22nd, 12:00 pm
President Biden and PM Modi reaffirmed the U.S.-India Comprehensive Global and Strategic Partnership, highlighting unprecedented levels of trust and collaboration. They emphasized shared values like democracy, freedom, and human rights, while commending progress in defense cooperation. President Biden praised India's global leadership, including its G-20 role and humanitarian efforts in Ukraine. Both leaders supported India's permanent membership in a reformed U.N. Security Council and underscored the importance of the U.S.-India partnership in building a secure, prosperous, and inclusive future.नवी दिल्लीत दुसऱ्या आशिया प्रशांत नागरी विमान वाहतूक मंत्र्यांच्या परिषदेत पंतप्रधानांनी केलेले भाषण
September 12th, 04:00 pm
सर्व देशांच्या मान्यवरांचे मी मनापासून स्वागत करतो आणि या दोन दिवसीय शिखर परिषदेत तुम्ही या क्षेत्राशी संबंधित अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली आहे. मला विश्वास आहे की, नागरी विमान वाहतूक क्षेत्रातील तज्ञ मंडळी इथे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. जे आपल्या सर्वांच्या वचनबद्धतेचे आणि आशिया-प्रशांत क्षेत्राच्या क्षमतेचे प्रतिबिंब आहे. आंतरराष्ट्रीय नागरी हवाई वाहतूक संघटनेला 80 वर्षे पूर्ण झाली आहेत आणि 80 हजार झाडे लावण्याचा आणि ती ही आईच्या नावाने लावण्याचा एक मोठा उपक्रम आपले मंत्री नायडू जी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली हाती घेण्यात आला. मात्र मी आणखी एका विषयाकडे तुमचे लक्ष आकर्षित करू इच्छितो, आपल्या देशात जेव्हा एखादी व्यक्ती 80 वर्षांची होते, तेव्हा तो आनंद एका वेगळ्या प्रकारे साजरा केला जातो; आणि आपल्याकडे आपल्या पूर्वजांनी जे काही गणित मांडले आहे, ते म्हणतात की जेव्हा एखादी व्यक्ती 80 वर्षांची होते तेव्हा त्या व्यक्तीने सहस्त्रचंद्रदर्शन म्हणजेच एक हजार वेळा पूर्ण चंद्र पाहिलेला असतो. याचा अर्थ या क्षेत्रातील आपल्या संघटनेने देखील एक हजार पौर्णिमा पाहिल्या आहेत आणि उड्डाण करून एक प्रकारे त्याला जवळून पाहण्याचा अनुभव देखील घेतला आहे. तर या पृथ्वीच्या लाटेतही 80 वर्षांचा हा अविस्मरणीय प्रवास, यशस्वी प्रवास अभिनंदनास पात्र आहे.BJP is emphasizing the true social empowerment of Dalits and OBC: PM Modi in Patiala, Punjab
May 23rd, 05:00 pm
Ahead of the impending Lok Sabha elections in 2024, Prime Minister Narendra Modi addressed a powerful rally amid a passionate welcome by the people of Patiala, Punjab. PM Modi began his address by paying rich tributes to the land of ‘Guru Tegh Bahadur.’ He said, “After the five phases of voting, the message of the people of India resonates with ‘Fir ek Baar, Modi Sarkar’.” He urged Punjab to vote for the BJP to ensure a ‘Viksit Bharat.’पंजाबच्या पतियाळा येथे झालेल्या विराट सभेवेळी पंतप्रधान मोदींचे उत्स्फूर्त स्वागत
May 23rd, 04:30 pm
सध्या होत असलेल्या 2024 च्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्र्वभूमीवर, पतियाळा येथे झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जोरदार सभेवेळी पंजाबमधील लोकांनी त्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. 'गुरू तेग बहादूर' यांच्या भूमीला विनम्र अभिवादन करून पंतप्रधान मोदींनी भाषणाची सुरुवात केली. ते म्हणाले, मतदानाचे पाच टप्पे पार पडल्यानंतर, 'फिर एक बार, मोदी सरकार'च्या भारतीय जनतेच्या संदेशाचे प्रतिध्वनी दुमदुमत आहेत. 'विकसित भारताचे' ध्येय साध्य करण्यासाठी पंजाबच्या जनतेने भाजपला मतदान करावे असे आवाहन त्यांनी केले.राजस्थानातील पोखरण येथे ‘एक्सरसाइज भारत शक्ती’ कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
March 12th, 02:15 pm
राजस्थानचे मुख्यमंत्री श्रीमान भजनलाल जी शर्मा, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी राजनाथ सिंह जी, गजेंद्र शेखावत जी, कैलाश चौधरी जी, पीएसए प्राध्यापक अजय सूद जी, सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान, एअर चीफ मार्शल व्ही.आर. चौधरी, नौदल प्रमुख अॅडमिरल हरी कुमार, लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे, वरिष्ठ अधिकारीवर्ग, तिन्ही सेनेतील सर्व शूर वीर.... आणि इथे उपस्थित असलेले पोखरणच्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो !राजस्थानातील पोखरण येथे 'भारत शक्ती "या तिन्ही सैन्यदलांच्या नेमबाजी आणि लष्करी डावपेचांच्या सराव कार्यक्रमात पंतप्रधान झाले सहभागी
March 12th, 01:45 pm
इथे आज दिसलेले शौर्य आणि कौशल्य हे नव्या भारताची हाक आहे. “आज पुन्हा एकदा पोखरण भारताच्या आत्मनिर्भरता, आत्मविश्वास आणि त्याच्या वैभवाच्या त्रिवेणीचे साक्षीदार बनले आहे”, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. हे तेच पोखरण आहे ज्याने भारताची अणुचाचणी पाहिली आणि आज आपण स्वदेशीकरणाच्या सामर्थ्याचे साक्षीदार झालो आहोत असे ते पुढे म्हणाले.