Japan's expertise and investment combine with India's speed and scale, benefiting the entire world: PM Modi at India-Japan Joint Economic Forum

July 02nd, 03:35 pm

Addressing the India-Japan Joint Economic Forum, PM Modi congratulated Japanese companies on becoming part of the India-Japan success story. He noted that the PMO will organise a dedicated Japan Business Week, with senior PMO officials engaging with them to further improve Ease of Doing Business. He called upon business leaders to ensure that Japanese investment in India surpasses the target of 10 trillion yen over the next decade.

न्यूज 18 रायझिंग भारत समिटमधील पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर

February 27th, 08:30 pm

आपण सर्वजण रायझिंग भारताची चर्चा करत आहोत. आणि यामध्ये स्ट्रेंथ विदिन यावर तुम्हा सर्वांचा भर आहे, म्हणजेच सोप्या शब्दात सांगायचं तर, आपलं स्वतःचं सामर्थ्य हा तुमचा प्रमुख मुद्दा आहे. आणि आपल्याकडे शास्त्रांमध्ये तर म्हटलंच आहे - तत् त्वम असि! म्हणजे ज्या ब्रह्माच्या शोधात आपण निघालो आहोत, ते आपणच आहोच, ते आपल्यामध्येच आहे. जे सामर्थ्य आपल्या आतमध्येच आहे, तेच आपल्याला ओळखायचं आहे. गेल्या 11 वर्षांमध्ये भारताने आपलं तेच सामर्थ्य ओळखलं आहे, आणि हे सामर्थ्य आणखी सशक्त करण्यासाठी आज देश अविरत प्रयत्न करत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेटवर्क18 रायझिंग भारत शिखर परिषदेत भाषण

February 27th, 08:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्ट्रेंथ विदीन या विषयावर आधारित रायझिंग भारत शिखर परिषदेला संबोधित केले. पंतप्रधानांनी गेल्या 11 वर्षांतील भारताच्या प्रवासावर प्रकाश टाकत देशाचे गमावलेले सामर्थ्य पुन्हा प्राप्त करणे, आर्थिक स्वावलंबन आणि 2047 पर्यंत विकसित भारत बनविण्यासाठीचा आराखडा या मुद्द्यांवर सविस्तर भाष्य केले.

मन की बात फेब्रुवारी 2026

February 22nd, 11:30 am

‘मन की बात’ मध्ये आपले स्वागत आहे, शुभेच्छा आहेत. (अभिनंदन आहे.) मन की बात हे देशाच्या आणि देशवासियांच्या कार्यकर्तृत्वाला (उपलब्धी) सर्वांसमोर आणण्यासाठी एक सशक्त व्यासपीठ आहे. नुकत्याच दिल्लीत संपन्न झालेल्या ग्लोबल एआय इम्पॅक्ट समिटमध्ये देशाने अशीच एक उपलब्धी पाहिली. अनेक देशांतील नेते, उद्योग क्षेत्रातील अग्रणी, नवोन्मेषक आणि स्टार्ट अप क्षेत्राशी संबंधित लोक, एआय इम्पॅक्ट समिटसाठी भारत मंडपम मध्ये एकत्र आले होते. आगामी एआय च्या शक्तीचा उपयोग जगभरात कसा केला जाईल या दृष्टीने ही शिखर परिषद एक महत्त्वाचे वळण ठरली.

पंतप्रधानांनी भूषवले भारतीय एआय स्टार्टअप्ससोबतच्या गोलमेज बैठकीचे अध्यक्षपद

January 08th, 02:48 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी 7, लोक कल्याण मार्ग या आपल्या निवासस्थानी भारतीय एआय स्टार्टअप्ससोबत एका गोलमेज बैठकीचे अध्यक्षपद भूषवले.