जी-20 परिषदेतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निवेदन: सत्र 3

November 23rd, 04:05 pm

तंत्रज्ञान जसे पुढे जात आहे, तसे संधी आणि संसाधने काही मोजक्या हातांत केंद्रित होत आहेत. जगात महत्वपूर्ण तंत्रज्ञानावरुन संघर्ष वाढत आहे. हे मानवतेसाठी चिंतेचे कारण तर आहेच, पण नवोन्मेषाच्या मार्गातही अडथळा आहे. यावर उपाय शोधण्यासाठी आपली विचारसरणीत मूलभूत बदल करावे लागतील.

"सर्वांसाठी न्याय्य आणि योग्य भविष्य" या विषयावरील जी20 सत्रात पंतप्रधानांचे संबोधन

November 23rd, 04:02 pm

पंतप्रधानांनी आज सर्वांसाठी न्याय्य आणि योग्य भविष्य - महत्त्वपूर्ण खनिजे; सन्मानजनक रोजगार; कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावरील जी20 शिखर परिषदेच्या तिसऱ्या सत्राला संबोधित केले. महत्त्वपूर्ण तंत्रज्ञानाचा ज्या प्रकारे प्रसार केला जातो, त्यामध्ये मूलभूत बदल करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले. त्यांनी नमूद केले की, असे तंत्रज्ञान 'वित्त-केंद्रित' ऐवजी 'मानव-केंद्रित', 'राष्ट्रीय' ऐवजी 'जागतिक' आणि 'बंदिस्त प्रारुपां' ऐवजी 'मुक्त स्त्रोत' प्रणालीवर आधारित असले पाहिजे. हा दृष्टिकोन भारताच्या तंत्रज्ञान परिसंस्थेत समाविष्ट केला गेला आहे आणि त्याचे महत्त्वपूर्ण फायदे झाले आहेत, मग ते अंतराळ तंत्रज्ञानाचा वापर असो, कृत्रिम बुद्धिमत्ता असो किंवा डिजिटल व्यवहार असो, जिथे भारत जागतिक नेता आहे, असे त्यांनी सांगितले.

आयबीएसए नेत्यांच्या बैठकीत पंतप्रधानांचे निवेदन

November 23rd, 12:45 pm

जोहानस-बर्ग” सारख्या जिवंत आणि सुंदर शहरात आयबीएसए नेत्यांच्या बैठकीत सहभागी होणे माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा विषय आहे. या बैठकीसाठी मी आयबीएसए चे अध्यक्ष राष्ट्रपति लुला यांचे मनापासून आभार मानतो. आणि राष्ट्रपति रामाफोसा यांना आदरातिथ्याबद्दल धन्यवाद देतो.

जोहान्सबर्ग येथे आयबीएसए नेत्यांच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सहभाग

November 23rd, 12:30 pm

ही बैठक अत्यंत योग्य वेळी होत असल्याचे सांगून पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले की ही बैठक आफ्रिकेच्या भूमीवर झालेल्या पहिल्या जी-20 शिखर परिषदेच्या निमित्ताने झाली असून ग्लोबल साउथ देशांच्या सलग चार जी-20 अध्यक्षपदाच्या कार्यकाळाचा समारोप करते. या चारपैकी शेवटची तीन अध्यक्षपदे भारत - ब्राझील - दक्षिण आफ्रिका संवाद मंच (आयबीएसए) सदस्य राष्ट्रांकडे होती. या दरम्यान मानव-केंद्रित विकास, बहुपक्षीय सुधारणा आणि शाश्वत विकासावर लक्ष केंद्रित करणारे अनेक महत्त्वाचे उपक्रम राबवण्यात आले आहेत, असे त्यांनी नमूद केले.

पंतप्रधानांनी राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्याशी दूरध्वनीवरून साधला संवाद

September 06th, 06:11 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फ्रेंच प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांनी दूरध्वनीवरून साधला संवाद

August 27th, 08:32 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आज फिनलंड प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांनी दूरध्वनीवरून संवाद साधला.