अहमदाबादमधील दुःखद विमान दुर्घटनेतील जखमींची पंतप्रधानांनी घेतली भेट
June 13th, 02:14 pm
अहमदाबाद इथल्या दुःखद विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अहमदाबादला भेट दिली. या दुर्घटनेत अनेक प्रवाश्यांनी जीव गमावला आहे. पीडित कुटुंबांसोबत असल्याची भावना व्यक्त करताना मोदी यांनी या घटनेत जखमी झालेल्यांची भेट घेतली, या अपघातात बचावलेल्या एकमेव व्यक्तीचाही यात समावेश होता. या कठीण काळात देशाच्या अतूट पाठिंब्याचे आश्वासन पंतप्रधानांनी दिले.अहमदाबाद विमान दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दुःख
June 13th, 10:53 am
अहमदाबादमधील दुःखद विमान अपघातात झालेल्या मोठ्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. शोकग्रस्त कुटुंबांच्या अपार वेदना आणि हानी याबद्दल दुःख व्यक्त करून मोदी यांनी आपल्या सहवेदना शोकाकुल कुटुंबासोबत असल्याचे सांगितले.अहमदाबाद दुर्घटनेबद्दल पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केले, तातडीच्या आणि परिणामकारक पद्धतीने मदतीची दिली हमी
June 12th, 04:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमध्ये आज झालेल्या दुर्दैवी घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे आणि या घटनेने मोठा धक्का बसला असल्याचे सांगितले आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण देश स्तब्ध आणि दुःखी झाला आहे. ही घटना शब्दात वर्णन करण्यापलीकडे दुःखद आहे, असे त्यांनी म्हटले आहे.