अहमदाबाद मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या टप्पा 2A ला (कोटेश्वर रोड ते विमानतळ कॉरिडोअर) केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
June 10th, 01:59 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत मंत्रिमंडळाने अहमदाबाद मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या टप्पा 2(A) ला मंजुरी दिली आहे. या अंतर्गत 5 स्थानकांचा (4 उन्नत आणि 1 भूमिगत) समावेश असलेला 6.032 किलोमीटर लांबीचा कॉरिडोअर बांधला जाणार आहे. टप्पा 2(A) कार्यान्वित झाल्यानंतर, अहमदाबाद-गांधीनगर दरम्यान एकूण 77.63 किलोमीटरचे सक्रिय मेट्रो रेल्वेचे जाळे स्थापित होणार आहे. आश्रम रोड, कोटेश्वर प्राचीन मंदिर, साबरमती रिव्हर, सरदार नगर आणि एअरपोर्ट अशी या टप्पा 2(A) कॉरिडोअरअंतर्गतच्या पाच स्थानकांची नावे आहेत.गुजरात मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (जीएमआरसी) च्या गिफ्ट सिटी ते शाहपूर पर्यंतच्या विद्यमान उत्तर-दक्षिण कॉरिडॉरच्या विस्ताराला मंत्रिमंडळाने दिली मान्यता
February 24th, 03:33 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आज गुजरात मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (जीएमआरसी) च्या गिफ्ट सिटी ते शाहपूर पर्यंतच्या विस्ताराला मंजुरी दिली. हा विस्तार 3.33 किलोमीटर लांबीचा असून त्यात तीन उन्नत स्थानके असतील. हा प्रकल्प अंदाजे चार वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या टप्पा-2 चे केले उद्घाटन
September 16th, 02:42 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अहमदाबाद मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन केले. या मार्गावर केलेल्या प्रवासादरम्यान पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांशी संवादही साधला.