India – France Joint Statement
February 18th, 08:10 am
At the invitation of Hon’ble Prime Minister of India, Shri Narendra Modi, President of the French Republic H.E. Mr. Emmanuel Macron paid an official visit to India from 17 to 19 February 2026 and participated in the Artificial Intelligence Impact Summit 2026. During the visit, the two leaders held bilateral talks and jointly inaugurated the 2026 India-France Year of Innovation in Mumbai on 17 February. This is President Macron’s 4th visit to India and it follows Prime Minister Modi’s visit to France in February 2025.विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग 2026 च्या समारोपातील पंतप्रधानांचे संबोधन
January 12th, 06:45 pm
जेव्हा 2047मध्ये आपण स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण होतील, त्या टप्प्याकडे जाणारा प्रवास भारतासाठी महत्त्वाचा आहे, आणि तोच कालावधी तुमच्याही आयुष्यातील सर्वांत महत्त्वाचा काळ असेल, म्हणजेच तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. तुमची ताकद भारताचे ताकद होईल, तुमचे यश, भारताच्या यशाला नव्या शिखरावर घेऊन जाईल. विकसित भारत यंग लीडर्स डायलॉगमध्ये सहभागी झाल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो. या विषयावर मी पुढे सविस्तर चर्चा करेन, पण पहिल्यांदा आजच्या विशेष दिवसाविषयी बोलू या.Prime Minister Shri Narendra Modi addresses the Viksit Bharat Young Leaders Dialogue 2026
January 12th, 06:30 pm
In his address at the concluding session of the Viksit Bharat Young Leaders Dialogue 2026, PM Modi underscored the critical role of youth leadership in realising the vision of a developed India. He highlighted key reforms and initiatives such as Startup India, Digital India, Ease of Doing Business, and the simplification of tax and compliance, which accelerated India’s startup revolution. The PM encouraged the youth to move forward with confidence, expressing unwavering faith in their potential.‘सिंटेर्ड रेअर अर्थ परमनंट मॅग्नेट’ (आरईपीएम) च्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी 7,280 कोटी रुपयांच्या योजनेला मंत्रिमंडळाने दिली मान्यता
November 26th, 04:25 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आज 'सिंटेर्ड रेअर अर्थ परमनंट मॅग्नेटस् (आरईपीएम म्हणजेच - निओडिमियम, लोखंड आणि बोरोन यांच्या धातुमिश्रणापासून बनवले जाणारे सर्वात मजबूत प्रकारचे स्थायी चुंबक) उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी 7,280 कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी दिली. अशा प्रकारच्या पहिल्याच उपक्रमाचे उद्दिष्ट भारतात प्रतिवर्षी 6,000 मेट्रिक टन (एमटीपीए) एकात्मिक रेअर अर्थ परमनंट मॅग्नेट (आरईपीएम) उत्पादन क्षमता निर्माण करणे हे आहे. यामुळे भारताची आत्मनिर्भरता वाढवून जागतिक आरईपीएम बाजारपेठेत देशाला एक महत्त्वपूर्ण स्थान मिळेल.हैदराबादमधील सफ्रान एअरक्राफ्ट इंजिन सर्व्हिसेस इंडिया सुविधेच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांच्या भाषणाचा मराठी अनुवाद
November 26th, 10:10 am
“भारताचे नागरी विमान वाहतूक मंत्री के. राम मोहन नायडू जी, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी जी, सफ्रान समूहाशी संबंधित सर्व मान्यवर, आणि उपस्थित बंधू-भगिनींनो!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबाद येथील सफ्रान एअरक्राफ्ट इंजिन सर्व्हिसेस इंडिया सुविधेचे दूरदृश्य प्रणालीद्वारे केले उद्घाटन
November 26th, 10:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील, जीएमआर एरोस्पेस अँड इंडस्ट्रियल पार्क - सेझ, येथील सफ्रान एअरक्राफ्ट इंजिन सर्व्हिसेस इंडिया (एसएईएसआय) सुविधेचे उद्घाटन केले. आजपासून भारताचे हवाई वाहतूक क्षेत्र नवीन भरारी घेण्यासाठी सज्ज झाले आहे, सफ्रानच्या या नव्या सुविधेमुळे भारत जागतिक एमआरओ अर्थात देखभाल, दुरुस्ती आणि संधारण केंद्र म्हणून उदयाला येईल, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. हे देखभाल, दुरुस्ती आणि संधारण सुविधा केंद्र युवकांसाठी उच्च तंत्रज्ञानाधारित हवाई वाहतूक क्षेत्रात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करेल, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. आपण 24 नोव्हेंबर रोजी सफ्रानच्या संचालक मंडळ आणि व्यवस्थापनाशी संवाद साधला होता आणि त्यांच्याबरोबर याआधीही झालेल्या चर्चेत भारताबद्दलचा त्यांचा विश्वास आणि आशा दिसून आली होती, असे पंतप्रधान म्हणाले. सफ्रानची भारतातील गुंतवणूक देखील त्याच गतीने कायम राहील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पंतप्रधानांची सफ्रानच्या टीमचे नवीन सुविधेबद्दल अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 30 मार्च रोजी महाराष्ट्र आणि छत्तीसगढला भेट देणार
March 28th, 02:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 30 मार्च रोजी महाराष्ट्र आणि छत्तीसगढला भेट देणार आहेत. या दौऱ्यात ते सर्वप्रथम नागपूरला जातील आणि सकाळी 9 वाजता स्मृती मंदिर येथे दर्शन घेऊन त्यानंतर दीक्षाभूमीला भेट देतील.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फ्रान्स भेटीदरम्यान जारी केलेले भारत - फ्रान्स संयुक्त निवेदन
February 12th, 03:22 pm
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या निमंत्रणावरून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10-12 फेब्रुवारी 2025 या काळात फ्रान्सला भेट दिली. भारत आणि फ्रान्स यांनी 10 आणि 11 फेब्रुवारी 2025 ला झालेल्या कृत्रिम बुद्धीमत्ता कृती शिखर परिषदेचे सहअध्यक्ष पद भूषवले.ब्लेचली पार्क (नोव्हेंबर 2023 ) आणि सेउल (मे 2024) शिखर परिषदांदरम्यान ठरवल्मया गेलेल्या महत्वाच्या मुद्यांबाबत पुढील पाऊलांसंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी देशांचे आणि प्रशासनाचे प्रमुख, आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रमुख,लघु आणि मोठे उद्योग,शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी,बिगर सरकारी संस्था,कलाकार आणि नागरी समाजाचे प्रतिनिधी यात सहभागी झाले होते. जागतिक एआय क्षेत्र सार्वजनिक हितासाठी सामाजिक,आर्थिक आणि पर्यावरणविषयक फलनिष्पत्ती प्रदान करेल याची सुनिश्चिती करण्यासाठी ठोस पाऊले उचलण्याप्रती त्यांनी आपली कटिबद्धता अधोरेखित केली. एआय कृती शिखर परिषदेच्या यशस्वी आयोजनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांचे अभिनंदन केले. पुढच्या एआय कृती शिखर परिषदेचे यजमानपद भारत भूषवणार असल्याबद्दल फ्रान्सने भारताचे स्वागत केले.पंतप्रधानांनी 14 व्या भारत-फ्रान्स सीईओ मंचाला केले संबोधित
February 12th, 12:25 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आज पॅरिसमध्ये 14 व्या भारत-फ्रान्स सीईओ मंचाला संयुक्तपणे संबोधित केले. संरक्षण, एरोस्पेस, महत्वपूर्ण आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, प्रगत उत्पादन, कृत्रिम बुद्धिमत्ता, जीवन-विज्ञान, निरामय आरोग्य आणि जीवनशैली, तसेच अन्न आणि आदरातिथ्य यासारख्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करून दोन्ही देशांमधील कंपन्यांच्या विविध गटातील मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) या मंचावर एकत्र आले होते. .न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी साधला दूरध्वनीवरून संवाद
July 20th, 02:37 am
न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.PM Modi attends News18 Rising Bharat Summit
March 20th, 08:00 pm
Prime Minister Narendra Modi attended and addressed News 18 Rising Bharat Summit. At this time, the heat of the election is at its peak. The dates have been announced. Many people have expressed their opinions in this summit of yours. The atmosphere is set for debate. And this is the beauty of democracy. Election campaigning is in full swing in the country. The government is keeping a report card for its 10-year performance. We are charting the roadmap for the next 25 years. And planning the first 100 days of our third term, said PM Modi.केरळमध्ये विक्रम साराभाई अंतराळ केंद्रात विविध प्रकल्पांच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मजकूर
February 27th, 12:24 pm
केरळचे राज्यपाल श्री आरिफ मोहम्मद खान, मुख्यमंत्री श्री पिनाराई विजयन जी, राज्यमंत्री, माझे सहकारी श्री वी. मुरलीधरन जी, इस्रो परिवारातील सर्व सदस्य, यांना माझा नमस्कार!केरळमधील तिरुवनंतपुरम येथील विक्रम साराभाई अंतराळ केंद्राला (व्हीएसएससी) पंतप्रधानांनी दिली भेट
February 27th, 12:02 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळातील तिरुवनंतपुरम येथील विक्रम साराभाई अंतराळ केंद्राला (व्हीएसएससी) ला भेट दिली. यावेळी त्यांनी सुमारे 1800 कोटी रुपयांच्या तीन महत्त्वाच्या अंतराळ पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन केले. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातील एसएलव्ही इंटिग्रेशन फॅसिलिटी (पीआयएफ); महेंद्रगिरी येथील इस्रो प्रोपल्शन कॉम्प्लेक्समध्ये नवीन ‘सेमी-क्रायोजेनिक्स इंटिग्रेटेड इंजिन आणि स्टेज टेस्ट सुविधा’; आणि तिरुवनंतपुरम येथील व्हीएसएससीमध्ये ‘ट्रायसोनिक विंड टनल’ हे ते तीन प्रकल्प आहेत.फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांसोबत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
February 14th, 04:31 pm
या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल मी माझे मित्र, राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे विशेष आभार मानतो.एअर इंडिया-एअरबस यांच्यातील भागीदारीच्या शुभारंभाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी व्हिडीओ कॉल च्या माध्यमातून साधला संवाद
February 14th, 04:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, एअर इंडिया आणि एअरबस यांच्यातील भागीदारीच्या शुभारंभाच्या निमित्ताने, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष एच.ई. इमॅन्युएल मॅक्रॉन, रतन टाटा, एमेरिटस, टाटा सन्स चे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन, टाटा सन्स बोर्डाचे अध्यक्ष, कॅम्पबेल विल्सन, एअर इंडियाचे सीईओ आणि एअरबस चे सीईओ गिलॉम फौरी यांच्याशी, व्हिडिओ कॉल च्या माध्यमातून संवाद साधला.कर्नाटक मधील तुमकुरू येथे एचएएल हेलिकॉप्टर कारखान्याचे राष्ट्रार्पण आणि तुमकुरू औद्योगिक वसाहतीच्या पायाभरणी समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण
February 06th, 04:20 pm
कर्नाटक ही संत, ऋषी-मुनींची भूमी आहे. कर्नाटकने आध्यात्म, ज्ञान आणि विज्ञानाची महान भारतीय परंपरा नेहमीच बळकट केली आहे. यातही तुमकुरुचे विशेष महत्त्व आहे. सिद्धगंगा मठाची यात खूप मोठी भूमिका आहे. पूज्य शिवकुमार स्वामी जी यांनी घालून दिलेला ‘त्रिविधा दसोही’ म्हणजेच अन्न ,अक्षर आणि आश्रय यांचा वारसा आज सिद्धलिंग महास्वामी जी पुढे नेत आहेत. मी आदरणीय संतांना नमन करतो. गुब्बी स्थित श्री चिदम्बर आश्रम आणि भगवान चन्नबसवेश्वर यांनाही मी वंदन करतो !तुमकुरू येथील एचएएल हेलिकॉप्टर कारखान्याचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण
February 06th, 04:12 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तुमकुरू येथे एचएएल हेलिकॉप्टर कारखान्याचे लोकार्पण केले. तसेच त्यांनी तुमकुरू औद्योगिक वसाहत आणि तुमकुरू मधील टिपूर आणि चिक्कनायकनहळ्ळी या दोन ठिकाणी जल जीवन अभियान प्रकल्पांची कोनशीला देखील बसविली. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी हेलिकॉप्टर निर्माण सुविधा आणि स्ट्रक्चर हँगर यांची पाहणी केली तसेच हलक्या वजनाच्या हेलिकॉप्टरचे अनावरण केले.Vision of self-reliant India embodies the spirit of global good: PM Modi in Indonesia
November 15th, 04:01 pm
PM Modi interacted with members of Indian diaspora and Friends of India in Bali, Indonesia. He highlighted the close cultural and civilizational linkages between India and Indonesia. He referred to the age old tradition of Bali Jatra” to highlight the enduring cultural and trade connect between the two countries.इंडोनेशियातील बाली येथे भारतीय समुदाय आणि भारत मित्रांशी पंतप्रधानांचा संवाद
November 15th, 04:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 नोव्हेंबर 2022 रोजी इंडोनेशियातील बाली येथे भारतीय समुदाय आणि भारत मित्रांच्या 800 हून अधिक सदस्यांना संबोधित केले आणि त्यांच्याशी संवाद साधला. संपूर्ण इंडोनेशियामधून उत्साही आणि वैविध्यपूर्ण अशी गर्दी जमली होती.वडोदरा इथे विमान निर्मिती कारखान्याच्या भूमिपूजन समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण
October 30th, 02:47 pm
भारत जगातले मोठे उत्पादन केंद्र व्हावा या दिशेने आज आम्ही मोठे पाऊल उचलत आहोत.भारत आज आपल्या लढाऊ विमानांची निर्मिती करत आहे, भारत आज आपल्या रणगाड्यांची निर्मिती करत आहे,आपल्या पाणबुड्यांची निर्मिती करत आहे.इतकेच नव्हे तर भारतात उत्पादित औषधे आणि लसी आज जगातल्या लाखो लोकांना जीवनदान देत आहेत. भारतात उत्पादित इलेक्ट्रॉनिक उपकरणे,भारतात निर्मिती करण्यात आलेले मोबाईल फोन, भारतात उत्पादित गाड्या आज अनेक देशात लोकप्रिय आहेत. मेक इन इंडिया, मेक फॉर द ग्लोब हा मंत्र घेऊन आगेकूच करणारा भारत आपले सामर्थ्य वृद्धींगत करत आहे. आता भारत वाहतुकीच्या विमानांचाही मोठा निर्माता बनेल.आज भारतात याची सुरवात झाली आहे. मला तो दिवस दिसतो आहे जेव्हा,जगातली मोठी प्रवासी विमानेही भारतात तयार होतील आणि त्यावर लिहिले असेल- मेक इन इंडिया