पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इथिओपियातील अदिस अबाबा येथील अदवा विजय स्मारकावर वाहिली आदरांजली
December 17th, 01:44 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अदिस अबाबा येथील अदवा विजय स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. हे स्मारक 1896 च्या अदवाच्या लढाईत आपल्या राष्ट्राच्या सार्वभौमत्वासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूर इथिओपियन सैनिकांना समर्पित आहे. हे स्मारक अदवाच्या नायकांच्या अमर आत्म्याला आदरांजली असून ते इथिओपियाच्या स्वातंत्र्य, सन्मान आणि जिद्दीच्या गौरवशाली वारशाचे दर्शन घडवते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इथिओपिया दौऱ्याच्या फलितांची यादी
December 16th, 10:41 pm
द्विपक्षीय संबंधांना 'धोरणात्मक भागीदारी' पर्यंत उन्नत करण्यात आले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे इथिओपियामध्ये स्नेहमय स्वागत
December 16th, 06:21 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या इथिओपियाच्या पहिल्या द्विपक्षीय दौऱ्यावर अदिस अबाबा येथे पोहोचले. विमानतळावर आगमन झाल्यावर इथिओपियाचे पंतप्रधान डॉ. अबी अहमद अली यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांचे स्नेहपूर्ण आणि रंगतदार स्वागत करण्यात आले.