राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल भारोत्तोलक अचिंता शेउली याचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

August 01st, 12:48 pm

बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल भारोत्तोलक अचिंता शेउली याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांसाठी भारतीय चमू रवाना होण्यापूर्वी अलीकडेच अचिंता शिउली याच्याशी साधलेला संवाद देखील मोदी यांनी सामायिक केला आहे.