TMC government is run either by goons or only after High Court and Supreme Court orders: PM Modi in Arambagh, West Bengal
April 26th, 01:50 pm
Addressing a Vijay Sankalp rally in Arambagh, West Bengal, PM Modi remarked that after 15 years of intimidation, the people of Bengal are now determined to defeat injustice. He noted that the TMC government acts only after the court intervention. He concluded by urging people to vote decisively for BJP, stating that only a government free from fear, corruption and syndicate control can unlock Bengal’s true potential.The expiry date of this 15-year syndicate TMC raj is 4 May: PM Modi in Bangaon, West Bengal
April 26th, 01:30 pm
Addressing a massive public rally in Bangaon, West Bengal, PM Modi delivered a sharp message against TMC’s corruption, syndicate raj and fear politics. Stating that “Nari Shakti” has been the worst affected under TMC rule, he called upon women to lead the change. He also outlined BJP’s roadmap for development, security and prosperity in West Bengal and recalled the legacy of Syama Prasad Mookerjee.PM Modi’s impactful rallies in Bangaon and Arambagh, West Bengal
April 26th, 01:24 pm
PM Modi addressed massive public gatherings in Bangaon and Arambagh, delivering a sharp message against TMC’s corruption, syndicate raj and fear politics, while presenting BJP’s roadmap for development, security and prosperity in West Bengal.नवी दिल्लीत भारत मंडपम येथे आयोजित वाययुजीएम (युग्म) बैठकीत पंतप्रधानांनी केलेले भाषण
April 29th, 11:01 am
आज येथे सरकार, शिक्षण क्षेत्र, विज्ञान आणि संशोधनाशी संबंधित विविध क्षेत्रातील मंडळी खूप मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. ही एकजूट, हे ऐक्य, यालाच युग्म असे म्हणतात. हे एक असे युग्म आहे ज्यामध्ये विकसित भारताच्या भविष्यकालीन तंत्रज्ञानाशी संबंधित भागधारक एकत्र आले आहेत, एकजूट झाले आहेत. भारताची नवोन्मेष क्षमता आणि गहन-तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये भारताचे स्थान बळकट करण्यासाठी आम्ही जे प्रयत्न करत आहोत त्यांना या कार्यक्रमाच्या आयोजनाद्वारे आणखी बळकटी मिळेल असा विश्वास मला वाटतो. आज आयआयटी कानपूर आणि आयआयटी मुंबई या संस्थांमध्ये कृत्रिम प्रज्ञा , गुप्तहेर यंत्रणा आणि जैवविज्ञान, जैव तंत्रज्ञान तसेच आरोग्य आणि वैद्यकीय सेवा यांच्याशी संबंधित सुपर हब्सची सुरुवात होत आहे. आज वाधवानी नवोन्मेष नेटवर्कची देखील सुरुवात झाली आहे. अनुसंधान राष्ट्रीय संशोधन संस्थेसोबत मिळून संशोधनाला चालना देण्याचा देखील निर्धार करण्यात आला आहे. या प्रयत्नासाठी वाधवानी प्रतिष्ठानचे, आमच्या आयआयटी संस्थांचे, आणि इतर सर्व भागधारकांचे मी अभिनंदन करतो. तुमची समर्पणवृत्ती आणि सक्रियतेमुळे खासगी आणि सरकारी क्षेत्राने एकत्र येऊन देशाच्या शिक्षण प्रणालीमध्ये अनेक सकारात्मक बदल केले आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘युग्म’ नवोन्मेष परिषदेला केले संबोधित
April 29th, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित युग्म नवोन्मेष परिषदेला संबोधित केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना, त्यांनी सरकारी अधिकारी, शैक्षणिक संस्था आणि विज्ञान आणि संशोधन व्यावसायिकांच्या महत्त्वपूर्ण मेळाव्यावर प्रकाश टाकला आणि युग्म - विकसित भारतासाठी भविष्यातील तंत्रज्ञानाचा विकास करण्याच्या उद्देशाने एक सहकार्य - म्हणून हितधारकांच्या मिलाफावर भर दिला. या कार्यक्रमाद्वारे भारताची नाविन्यपूर्ण क्षमता आणि सखोल तंत्रज्ञानातील त्याची भूमिका वाढविण्याच्या प्रयत्नांना गती मिळेल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. आयआयटी कानपूर आणि आयआयटी मुंबई येथे कृत्रिम प्रज्ञा , सक्षम प्रणाली आणि जैवविज्ञान, जैवतंत्रज्ञान, आरोग्य आणि औषध यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या सुपर हबच्या उदघाटनाचा त्यांनी उल्लेख केला. राष्ट्रीय संशोधन संस्थेच्या सहयोगातून संशोधनाला चालना देण्याच्या बांधिलकीला दुजोरा देणाऱ्या वाधवानी नवोन्मेष नेटवर्कच्या उदघाटनाचाही त्यांनी उल्लेख केला. पंतप्रधानांनी वाधवानी प्रतिष्ठान, आयआयटी आणि या उपक्रमांमध्ये सहभागी असलेल्या सर्व हितधारकांचे अभिनंदन केले. खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रांमधील सहयोगाद्वारे देशाच्या शिक्षण व्यवस्थेत सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल आणि सक्रिय भूमिकेबद्दल त्यांनी रोमेश वाधवानी यांचे विशेष कौतुक केले.पंतप्रधान 11 एप्रिल रोजी उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशला भेट देणार आहेत
April 09th, 09:43 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 एप्रिल रोजी उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशचा दौरा करतील. ते वाराणसीला जातील आणि सकाळी 11 वाजता 3,880 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील. ते एका जाहीर सभेला देखील संबोधित करतील."सामाजिक समावेशकता आणि उपासमार व गरीबी विरोधात लढा" या विषयावरील जी 20 सत्रात पंतप्रधानांचे भाषण
November 18th, 08:00 pm
सुरुवातीलाच, जी 20 शिखर परिषदेच्या आयोजनासाठी केलेल्या उत्तम व्यवस्थेबद्दल तसेच यशस्वी जी 20 अध्यक्षतेसाठी अध्यक्ष लुला यांचे अभिनंदन करू इच्छितो.सामाजिक समावेशकता आणि उपासमार व गरीबी विरोधात लढा या विषयावरील जी 20 सत्राला पंतप्रधानांनी केले संबोधित
November 18th, 07:55 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सामाजिक समावेशकता आणि उपासमार व गरीबी विरोधात लढा’ या विषयावरील जी 20 शिखर परिषदेच्या उद्घाटन सत्राला आज संबोधित केले. शिखर परिषदेचे आयोजन केल्याबद्दल आणि प्रेमळ आदरातिथ्याबद्दल पंतप्रधानांनी ब्राझीलचे अध्यक्ष महामहिम लुईस इनासिओ लुला दा सिल्वा यांचे आभार मानले. शाश्वत विकास उद्दिष्टांवर केंद्रित ब्राझीलच्या जी 20 कार्यक्रम पत्रिकेचे त्यांनी कौतुक केले. हा दृष्टिकोन ग्लोबल साऊथच्या समस्या अधोरेखित करतो तसेच नवी दिल्ली जी 20 शिखर परिषदेचे लोककेंद्रित निर्णय पुढे नेतो असे पंतप्रधानांनी नमूद केले. एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य साठी भारतीय जी 20 अध्यक्षतेने दिलेला नारा रिओ चर्चेत देखील गुंजत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.प्रधानमंत्री आदिवासी उन्नत ग्राम अभियानाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
September 18th, 03:20 pm
देशाची सामाजिक-आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आदिवासी समुदाय, आदिवासी बहुल गावे आणि आकांक्षी जिल्ह्यांमधील आदिवासी कुटुंबांसाठी परिपूर्ती व्याप्ती स्वीकारून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने एकूण 79,156 कोटी रुपयांच्या (केंद्रीय वाटा: 56,333 कोटी रुपये आणि राज्याचा वाटा: 22,823 कोटी रुपये) आर्थिक तरतुदीसह प्रधानमंत्री आदिवासी उन्नत ग्राम अभियानाला मंजुरी दिली.मध्य प्रदेशातल्या झाबुआ येथे सुमारे 7300 कोटी रुपयांच्या बहुविध विकास प्रकल्पांची पंतप्रधानांनी केली पायाभरणी आणि राष्ट्रार्पण
February 11th, 07:35 pm
मध्य प्रदेशातल्या झाबुआ येथे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुमारे 7300 कोटी रुपयांच्या बहुविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्रार्पण केले. या विकास प्रकल्पांमुळे या क्षेत्रातील आदिवासी लोकसंख्येला मोठा लाभ होणार आहे. या क्षेत्रातील पाणीपुरवठ्यात सुधारणा होऊन पेयजलाची तरतूद होईल. तसेच मध्य प्रदेशातील रस्ते, रेल्वे, वीज आणि शिक्षण क्षेत्राला यामुळे चालना मिळणार आहे. यावेळी पंतप्रधानांनी विशेष मागास जमातीतील सुमारे 2 लाख महिला लाभार्थ्यांना आहार अनुदानाचा मासिक हप्ता वितरित केला. तसेच स्वामित्व योजनेच्या लाभार्थ्यांना 1.75 लाख अधिकार अभिलेखाचे वितरण केले आणि प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेअंतर्गत 559 गावांना 55.9 कोटी रुपये हस्तांतरित केले.२ कोटी लखपती दीदी निर्माण करण्याचे उद्दिष्ट; महिला स्वयंसहायता गटांमार्फत ड्रोन की उडान उपक्रम राबवणार : पंतप्रधान
August 15th, 01:33 pm
सरकार गावागावात २ कोटी ‘लखपती दीदी’ निर्माण करण्याच्या उद्देशाने महिला बचत गटांसोबत काम करत आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ७६ व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना सांगितलं. आज देशातील १० कोटी महिला स्वयं-सहायता गटांशी जोडल्या गेल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केलं. आज खेड्यापाड्यात, बँकेत, अंगणवाडीत आणि औषध देण्यासाठीही दीदी उपलब्ध आहेत, असं पंतप्रधान म्हणाले. कृषी तंत्रज्ञान आणि ग्रामीण विकासात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या संभाव्यतेचा फायदा घेण्यासाठी एक व्यासपीठ तयार केल्याचं पंतप्रधानांनी सांगितले. पंतप्रधान म्हणाले की 15,000 महिला स्वयं-सहायता गटांना कर्ज आणि ड्रोन चालविण्यासाठी आणि दुरुस्तीसाठी प्रशिक्षण दिले जाईल. ड्रोन की उडान उपक्रम महिला स्वयं-सहायता गटांद्वारे राबवला जाईल, असं पंतप्रधान म्हणाले.PM Modi attends a mass wedding ceremony – 'Papa Ni Pari' Lagnotsav 2022, at Bhavnagar, Gujarat
November 06th, 05:32 pm
Prime Minister Narendra Modi today attended a mass wedding ceremony – 'Papa Ni Pari' Lagnotsav 2022, at Bhavnagar, Gujarat. PM Modi spoke at the event and addressed the audience by giving his blessing to all 552 daughters getting married at the event. PM Modi, furthermore, highlighted the importance of having a father in one’s life.पंतप्रधान 18 ते 20 एप्रिल या कालावधीत गुजरात राज्याला देणार भेट
April 16th, 02:36 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 18 ते 20 एप्रिल या कालावधीत गुजरात राज्याला भेट देणार आहेत. 18 एप्रिल रोजी संध्याकाळी 6 च्या सुमाराला पंतप्रधान गांधीनगर येथील विद्यालयांसाठीच्या कमांड आणि कंट्रोल केंद्राला भेट देतील. 19 एप्रिल रोजी सकाळी 9.40 ला ते बनासकांठा मधील दियोदर येथील बनास डेरी संकुलातील विविध विकास प्रकल्पांची कोनशिला बसवून हे प्रकल्प राष्ट्राला अर्पण करतील. त्यानंतर दुपारी सुमारे साडेतीन वाजता ते जामनगर मधील जागतिक आरोग्य संघटनेच्या, पारंपारिक औषधविषयक जागतिक केंद्राची कोनशिला ठेवतील. तर 20 एप्रिल रोजी सकाळी साडेदहा च्या सुमारास ते गांधीनगर यथे होणाऱ्या वैश्विक आयुष गुंतवणूक आणि नवोन्मेष शिखर परिषदेचे उद्घाटन करतील. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजता ते दाहोद येथील आदिजाति महा संमेलनाला उपस्थित राहतील आणि तेथील विविध विकासकामांची कोनशिला बसवतील.जल जीवन अभियान देशाच्या विकासाला नवी प्रेरणा देत आहे – पंतप्रधान
April 09th, 09:01 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की जल जीवन अभियानाने आज देशाच्या विकासाला नवी प्रेरणा मिळत आहे. गेल्या 3 वर्षांहून कमी कालावधीत करोडो घरांपर्यंत पाणीपुरवठा पोहोचविण्यात आले असून हे अभियान म्हणजे जनतेच्या आकांक्षा आणि लोकसहभागाचे उत्तम उदाहरण आहे असे देखील त्यांनी सांगितले.आरोग्य क्षेत्रावर केंद्रीय अर्थसंकल्प 2022 चा सकारात्मक परिणाम या वरच्या वेबिनारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
February 26th, 02:08 pm
मंत्रिमंडळातले माझे सहकारी, देशभरातून सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रामध्ये आरोग्यसेवा क्षेत्राशी संबंधित सर्व व्यावसायिक, निमवैद्यकीय कर्मचारी, परिचारक, आरोग्य व्यवस्थापक, तंत्रज्ञान आणि संशोधनाशी जोडले गेलेले महनीय, महिला आणि सज्जन हो!पंतप्रधानांनी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अर्थसंकल्पपश्चात वेबिनारचे केले उद्घाटन
February 26th, 09:35 am
पंतप्रधानांनी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अर्थसंकल्पपश्चात वेबिनारचे आज उद्घाटन केले. पंतप्रधानांद्वारे संबोधित होत असलेल्या अर्थसंकल्पपश्चात वेबिनारच्या मालिकेतील हा पाचवा वेबिनार आहे. केंद्रीय मंत्री, सार्वजनिक तसेच खासगी क्षेत्रातील आरोग्य सेवा व्यावसायिक तसेच निम-वैद्यकीय क्षेत्र शुश्रुषा, आरोग्य व्यवस्थापन, तंत्रज्ञान आणि संधोधन क्षेत्रातील व्यावसायिक देखील या प्रसंगी उपस्थित होते.Double engine government in Punjab will ensure development, put an end to mafias: PM Modi
February 17th, 11:59 am
Continuing his election campaigning spree, PM Modi addressed a rally in Punjab’s Fazilka. Addressing the huge rally, he said, “Today Punjab needs a government that draws inspiration from patriotism, from the development of Punjab. BJP has come before you with dedication, with the resolve of security and development of Punjab.”PM Modi addresses a Vishal Jan Sabha in Punjab’s Fazilka
February 17th, 11:54 am
Continuing his election campaigning spree, PM Modi addressed a rally in Punjab’s Fazilka. Addressing the huge rally, he said, “Today Punjab needs a government that draws inspiration from patriotism, from the development of Punjab. BJP has come before you with dedication, with the resolve of security and development of Punjab.”केंद्रीय अर्थसंकल्प 2022-23 संदर्भात पंतप्रधानांचे भाषण
February 01st, 02:23 pm
हा अर्थसंकल्प 100 वर्षातून एकदा उद्भवणाऱ्या महामारीच्या पार्श्वभूमीवर विकासाचा नवा विश्वास घेऊन आला आहे. हा अर्थसंकल्प अर्थव्यवस्थेला बळ देण्याबरोबरच सामान्य माणसासाठी अनेक नव्या संधी निर्माण करेल. हा अर्थसंकल्प अधिक पायाभूत विकास, अधिक गुंतवणूक आणि अधिक रोजगाराच्या नव्या संधींनी युक्त अर्थसंकल्प आहे. आणखी एक नवीन क्षेत्र खुले झाले आहे, आणि ते आहे हरित रोजगाराचे. हा अर्थसंकल्प तत्कालीन गरजा देखील पूर्ण करतो आणि देशातील युवकांचे उज्ज्वल भविष्य देखील सुनिश्चित करतो.“लोकांसाठीच्या आणि प्रगतीशील अर्थसंकल्पाबद्दल पंतप्रधानांनी केले अर्थमंत्र्यांचे अभिनंदन”
February 01st, 02:22 pm
शतकातून एकदाच येणाऱ्या नैसर्गीक संकटकाळातही या वर्षीचा अर्थसंकल्प विकासाचा नवा विश्वास घेउन आला आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. हा अर्थसंकल्प अर्थव्यवस्थेला समर्थ बनवेल व सामान्यांसाठी नव्या संधींचेही निर्माण करेल. असे त्यांनी म्हटले आहे.