Cabinet approves continuation of the PM-KISAN Scheme from 2026-27 to 2030-31 with a Financial Outlay of Rs.3.15 lakh crore
July 31st, 04:13 pm
The Union Cabinet, chaired by PM Modi, has approved the continuation of the PM-KISAN Scheme with an outlay of ₹3.15 lakh crore for 2026–31. The scheme will continue providing direct income support to eligible farmers, strengthening agricultural investment and rural prosperity.India-France partnership is emerging as a strong pillar of trust, stability and cooperation: PM Modi in Paris
June 18th, 11:41 pm
Addressing the Indian community in Paris, PM Modi highlighted India’s transformative growth over the past 12 years across infrastructure, digital technology, manufacturing, defence, space, innovation, healthcare and social development. He underscored the growing strength of the India-France Strategic Partnership, praised the Indian diaspora for serving as a vital bridge between the two nations and highlighted yoga and football as bonds connecting India and France.पॅरीसमधील भारतीय समुदायाला पंतप्रधानांचे संबोधन
June 18th, 09:30 pm
पंतप्रधानांनी 18 June 2026 रोजी पॅरीस इथे जमलेल्या भारतीय समुदायाला संबोधित केले. पंतप्रधानांचे कार्यक्रम स्थळी आगमन होताच उत्साहाने आणि रंगतदार स्वागत करण्यात आले. हे स्वागत मातृभूमीप्रती भारतीय समुदायाच्या मनातील आत्मीयतेचे प्रतिबिंब होते.पंतप्रधानांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणाचा मजकूर
April 18th, 08:45 pm
आज मी एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर विशेषतः देशातील माता-भगिनी आणि मुलींशी संवाद साधण्यासाठी आलो आहे! आज भारताचा प्रत्येक नागरिक पाहत आहे की, भारताच्या नारी शक्तीच्या भरारीला कशा प्रकारे रोखले गेले आहे. त्यांच्या स्वप्नांना निर्दयीपणे चिरडले गेले आहे. आमच्या सर्वतोपरी प्रयत्नांनंतरही आम्ही यशस्वी होऊ शकलो नाही, नारी शक्ती वंदन अधिनियमात दुरुस्ती होऊ शकली नाही! आणि मी यासाठी सर्व माता-भगिनींची, क्षमा मागतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्राला केले संबोधित
April 18th, 08:30 pm
भारतातील माता, भगिनी आणि कन्यांशी संबंधित एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर देशाला संबोधित करताना, पंतप्रधानांनी महिलांच्या प्रगतीला खीळ बसल्याबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. सरकारच्या अथक आणि प्रामाणिक प्रयत्नांनंतरही, 'नारी शक्ती वंदन अधिनियम' दुरुस्ती पारित होऊ शकली नाही, ज्यामुळे महिला वर्गाची रास्त स्वप्ने चिरडली गेली, असे त्यांनी नमूद केले. या दुर्दैवी परिस्थितीसाठी मी देशातील सर्व माता आणि भगिनींची मनापासून माफी मागतो, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.न्यूज 18 रायझिंग भारत समिटमधील पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर
February 27th, 08:30 pm
आपण सर्वजण रायझिंग भारताची चर्चा करत आहोत. आणि यामध्ये स्ट्रेंथ विदिन यावर तुम्हा सर्वांचा भर आहे, म्हणजेच सोप्या शब्दात सांगायचं तर, आपलं स्वतःचं सामर्थ्य हा तुमचा प्रमुख मुद्दा आहे. आणि आपल्याकडे शास्त्रांमध्ये तर म्हटलंच आहे - तत् त्वम असि! म्हणजे ज्या ब्रह्माच्या शोधात आपण निघालो आहोत, ते आपणच आहोच, ते आपल्यामध्येच आहे. जे सामर्थ्य आपल्या आतमध्येच आहे, तेच आपल्याला ओळखायचं आहे. गेल्या 11 वर्षांमध्ये भारताने आपलं तेच सामर्थ्य ओळखलं आहे, आणि हे सामर्थ्य आणखी सशक्त करण्यासाठी आज देश अविरत प्रयत्न करत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेटवर्क18 रायझिंग भारत शिखर परिषदेत भाषण
February 27th, 08:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्ट्रेंथ विदीन या विषयावर आधारित रायझिंग भारत शिखर परिषदेला संबोधित केले. पंतप्रधानांनी गेल्या 11 वर्षांतील भारताच्या प्रवासावर प्रकाश टाकत देशाचे गमावलेले सामर्थ्य पुन्हा प्राप्त करणे, आर्थिक स्वावलंबन आणि 2047 पर्यंत विकसित भारत बनविण्यासाठीचा आराखडा या मुद्द्यांवर सविस्तर भाष्य केले.ईटी नाऊ ग्लोबल बिझनेस समिटमध्ये पंतप्रधानांच्या भाषणाचे इंग्रजी भाषांतर
February 13th, 08:30 pm
आपल्या सर्वांचे या ग्लोबल बिझनेस समिटमध्ये मी मनःपूर्वक स्वागत करतो. आपण येथे “ए डिकेड ऑफ डिसरप्शन, ए सेंच्युरी ऑफ चेंज” या विषयावर चर्चा करत आहोत. विनीतजींचे भाषण ऐकल्यानंतर मला वाटते की, माझे काम खूप सोपे झाले आहे. मात्र एक छोटीशी विनंती करतो, आपल्याला इतके सगळे माहीत आहे, तर कधीतरी इटी मध्येही ते दिसायला हवे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईटी नाऊ ग्लोबल बिझनेस समिट 2026 ला केले संबोधित
February 13th, 08:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे ईटी नाऊ ग्लोबल बिझनेस समिट 2026 ला संबोधित केले. याप्रसंगी बोलताना, पंतप्रधानांनी जागतिक व्यापार शिखर परिषदेत उपस्थित असलेल्या सर्वांचे स्वागत केले आणि 'संकटांचे दशक, बदलाचे शतक' या संकल्पनेवर आपले विचार मांडले. 21 व्या शतकातील गेल्या दशकात अभूतपूर्व संकटे आली, ज्यात जागतिक महामारी, वेगवेगळ्या भागांमध्ये तणाव आणि युद्धे आणि जागतिक संतुलन बिघडवणारे पुरवठा साखळीतील बिघाड यांचा समावेश आहे, यावर त्यांनी भर दिला. संकट काळातच देशाचे सामर्थ्य समोर येते असे सांगून या अडथळ्यांना न जुमानता, भारताचे दशक उल्लेखनीय विकास, उत्कृष्ट कामगिरी आणि लोकशाहीच्या बळकट करणारे ठरले याबद्दल अभिमान व्यक्त केला.लखनौ इथे राष्ट्र प्रेरणा स्थळ उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांचे संबोधन
December 25th, 06:16 pm
उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, इथले लोकप्रिय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी, केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे वरिष्ठ सहयोगी आणि लखनौचे खासदार, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह जी, उत्तर प्रदेश भाजपा अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी श्रीमान पंकज चौधरी जी, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, ब्रजेश पाठक जी, उपस्थित अन्य मंत्रीगण, लोकप्रतिनिधी,महिला आणि पुरुषहो,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लखनौ इथल्या राष्ट्र प्रेरणा स्थळाचे उद्घाटन
December 25th, 05:23 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उत्तर प्रदेशातील लखनौ इथल्या राष्ट्र प्रेरणा स्थळाचे उद्घाटन झाले. माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवन आणि आदर्शांचा गौरव करण्यासाठी याची उभारणी केली आहे. यावेळी पंतप्रधानांनी माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या 101 व्या जयंती दिनानिमीत्त आयोजित कार्यक्रमाला संबोधितही केले.आज लखनौ ची ही भूमी एका नव्या प्रेरणेची साक्षीदार बनली आहे असे ते यावेळी म्हणाले. यावेळी पंतप्रधानांनी देशासह जागतिक समुदायाला नाताळच्या शुभेच्छा दिल्या. भारतातही लाखो ख्रिश्चन कुटुंबे आज हा सण साजरा करत असल्याचे त्यांनी नमूद केले. नाताळचा हा सण प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद घेऊन येवो अशी सदिच्छाही त्यांनी व्यक्त केली.मुंबईत येथे आयोजित ‘ग्लोबल फिनटेक फेस्टिव्हल’ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
October 09th, 02:51 pm
माननीय पंतप्रधान कीर स्टार्मर, आरबीआयचे गव्हर्नर, फिनटेक विश्वातील नवप्रवर्तक, नेतेमंडळी, उद्योग जगतातील दिग्गज आणि गुंतवणूकदार, भगिनी आणि बंधूंनो! मुंबईत आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट 2025 कार्यक्रमाला संबोधित केले
October 09th, 02:50 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रात मुंबई येथे ग्लोबल फिनटेक फेस्ट 2025 कार्यक्रमाला संबोधित केले. यावेळी उपस्थित असलेल्या सर्वांचे मनापासून स्वागत करत पंतप्रधान मोदी यांनी उर्जावान शहर, उद्योगांचे शहर आणि अमर्याद शक्यतांचे शहर अशा शब्दांत मुंबईचे वर्णन केले. त्यांनी त्यांचे मित्र पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे खास स्वागत केले आणि ग्लोबल फिनटेक महोत्सवाला उपस्थित राहिल्याबद्दल त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून, या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी त्यांनी वेळ काढल्याबद्दल विशेष उल्लेख केला.बिहारमध्ये मुख्यमंत्री महिला रोजगार योजना सुरु करताना पंतप्रधानांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे केलेले भाषण
September 26th, 11:30 am
नवरात्रीच्या या मंगलमय दिवसांमध्ये मला आज बिहारच्या स्त्रीशक्ती सोबत, त्यांच्या आनंदात सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. मी येथे पडद्यावर बघत होतो, लाखो महिला-भगिनी दिसत आहेत. नवरात्रीच्या या पवित्र काळात तुम्हा सर्वांचे आशीर्वाद ही आम्हां सर्वांसाठी फार मोठी ताकद आहे. मी आज तुमचे मनापासून आभार मानतो. आणि आजपासूनच ‘मुख्यमंत्री महिला रोजगार योजना’ सुरु होत आहे. मला सांगितल्यानुसार, आतापर्यंत या योजनेत 75 लाख भगिनी सहभागी झाल्या आहेत. आत्ताच या सर्व 75 लाख भगिनींच्या बँक खात्यांमध्ये एकाच वेळी 10-10 हजार रुपये पाठवण्यात आले आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेचा केला शुभारंभ
September 26th, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणाली द्वारे बिहारच्या मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेचा शुभारंभ केला. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर सर्वांना शुभेच्छा दिल्या. बिहारच्या महिलांच्या उत्सवात आपल्याला सहभागी होता आले, याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला आणि आज मुख्यमंत्री महिला रोजगार योजना सुरू होत असल्याचे नमूद केले. या उपक्रमात 75 लाख महिला यापूर्वीच सहभागी झाल्याचे मोदी यांनी अधोरेखित केले. त्यांनी जाहीर केले की या 75 लाख महिलांच्या बँक खात्यात एकाच वेळी प्रत्येकी 10,000 रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत.उत्तर प्रदेशात ग्रेटर नॉयडा येथे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण
September 25th, 10:22 am
यूपी इंटरनॅशनल ट्रेड शोमध्ये सहभागी झालेले सर्व व्यापारी, गुंतवणूकदार, उद्योजक आणि तरुण मित्रांचे मी मनःपूर्वक स्वागत करतो. येथे 2200 पेक्षा अधिक प्रदर्शक आपल्या उत्पादनांचे आणि सेवांचे प्रदर्शन करत आहेत, याचा मला आनंद वाटत आहे. यंदाच्या ट्रेड शोचा भागीदार देश रशिया आहे. म्हणजेच, या ट्रेड शोच्या माध्यमातून आपण काळाच्या कसोटीवर पारखलेली एक भागीदारी आणखी बळकट करत आहोत. मुख्यमंत्री योगीजींना, सरकारमधील इतर सर्व सहकाऱ्यांना आणि हितधारकांना या कार्यक्रमासाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील उत्तर प्रदेश आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शनाला केले संबोधित
September 25th, 10:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील उत्तर प्रदेश आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शन 2025 याचे आज उद्घाटन केले आणि उपस्थितांना संबोधित केले. या प्रसंगी बोलताना पंतप्रधानांनी उत्तर प्रदेश आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शनात सहभागी झालेल्या सर्व व्यापारी, गुंतवणूकदार, उद्योजक आणि तरुण प्रतिनिधींचे स्वागत केले.या कार्यक्रमात 2,200 हून अधिक प्रदर्शक त्यांची उत्पादने आणि सेवा प्रदर्शित करत आहेत याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. रशिया हा या व्यापार प्रदर्शनातील भागीदार देश आहे, जो काळाच्या कसोटीवर उतरलेल्या भागीदारीच्या सबलीकरणावर भर देतो, असे मोदींनी यावेळी अधोरेखित केले.या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, शासकीय अधिकारी आणि इतर भागधारकांचे अभिनंदन केले. हा दिवस पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीदिनी आला आहे,ज्यांनी राष्ट्राला अंत्योदय - म्हणजे तळागाळातील शेवटच्या व्यक्तीचा उत्कर्ष साधण्यासाठी मार्गदर्शन केले, असे पंतप्रधानांनी नमूद केले.अंत्योदय म्हणजे विकास हा गरिबातल्या गरीबापर्यंत पोहोचणे, सर्व प्रकारच्या भेदभावाचे उच्चाटन करणे, यावर पंतप्रधानांनी भर दिला आणि भारत आता जगाला सर्व समावेशक विकासाचे हेच प्रारुप असल्याचे दाखवून देत आहे,असे ते पुढे म्हणाले.पंतप्रधानांनी कर्तव्य पथ येथे कर्तव्य भवनच्या उद्घाटन कार्यक्रमात केलेले भाषण
August 06th, 07:00 pm
केंद्रिय मंत्रीमंडळातील माझे सर्व सहकारी, इथे उपस्थित असलेले संसद सदस्य, सरकारी कर्मचारी, अन्य मान्यवर आणि बंधु भगिनींनो,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील कर्तव्य पथ येथे कर्तव्य भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमाला केले संबोधित
August 06th, 06:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील कर्तव्य पथ येथे कर्तव्य भवन-3 च्या उद्घाटन कार्यक्रमाला संबोधित केले. क्रांतीचा महिना असलेल्या या ऑगस्ट महिन्यात, 15 ऑगस्टच्या आधी आणखी एक ऐतिहासिक घटना जोडली गेली असल्याचे ते म्हणाले. भारत आधुनिक भारताच्या निर्मितीशी संबंधित एकामागोमाग एक महत्त्वाचे यश पाहतो आहे, असे त्यांनी अधोरेखित केले. नवी दिल्लीतील कर्तव्य पथ, नवीन संसद भवन, संरक्षण कार्यालयाचे नवीन संकुल, भारत मंडपम, यशोभूमी, शहीदांना समर्पित राष्ट्रीय युद्ध स्मारक, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा, आणि आता कर्तव्य भवन अशा अलीकडील महत्वाच्या पायाभूत सुविधांचा त्यांनी उल्लेख केला. या केवळ नवीन इमारती किंवा नेहमीच्या पायाभूत सुविधा नाहीत, असे पंतप्रधान म्हणाले. अमृत काळात, विकसित भारताला आकार देणारी धोरणे याच वास्तुंमध्ये आखली जातील आणि येणाऱ्या दशकात देशाची वाटचाल या संस्थांमधूनच निश्चित होईल, असे पंतप्रधान म्हणाले. त्यांनी कर्तव्य भवनाच्या उद्घाटनाबद्दल सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या आणि या वास्तूच्या उभारणीत सहभागी असलेल्या अभियंत्यांचे आणि श्रमजीवींचे आभारही मानले.पंतप्रधानांनी भूषवले 46 व्या प्रगती बैठकीचे अध्यक्षपद
April 30th, 08:41 pm
सक्रीय प्रशासन आणि तत्पर अंमलबजावणीसाठी आयसीटी-आधारित प्रगती या केंद्र आणि राज्य सरकारांचा समावेश असलेल्या मल्टी- मोडल मंचाच्या 46 व्या बैठकीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी अध्यक्षस्थान भूषवले.