79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त दिलेल्या शुभेच्छांबद्दल पंतप्रधानांनी मानले जगभरातील नेत्यांचे आभार
August 15th, 07:26 pm
भारताच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्याबद्दल जगभरातील नेत्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभार मानले आहेत.79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील ठळक मुद्दे
August 15th, 03:52 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील लाल किल्ल्यावरून 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशाला संबोधित केले. त्यांचे हे भाषण 103 मिनिटांचे असून लाल किल्ल्यावरील सर्वात जास्त काळ चाललेले आणि महत्त्वाचे भाषण ठरले. या भाषणात, त्यांनी 2025 पर्यंत विकसित भारतासाठी एक महत्त्वाकांक्षी आराखडा मांडला. आत्मनिर्भरता, नावीन्यपूर्णता, आणि नागरिकांचे सक्षमीकरण यावर पंतप्रधानांनी भर दिला. एकेकाळी दुसऱ्यांवर अवलंबून असलेला देश, आज जागतिक स्तरावर आत्मविश्वासाने भरलेला, तंत्रज्ञानाने प्रगत आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनला आहे, हे त्यांनी आपल्या भाषणातून अधोरेखित केले.पंतप्रधान मोदींची शेतकऱ्यांना स्वातंत्र्यदिनानिमित्त आदरांजली
August 15th, 12:02 pm
79व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील शेतकऱ्यांना अवलंबनाकडून स्वावलंबनाकडे सुरू असलेल्या राष्ट्राच्या वाटचालीचा कणा संबोधून भावनिक आदरांजली वाहिली. वसाहतवादी राजवटीने देशाला दारिद्र्यात ढकलले होते, परंतु शेतकऱ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे भारताची धान्यकोठारे भरली आणि राष्ट्राचे अन्न सार्वभौमत्व सुरक्षित झाले, याची आठवण त्यांनी करून दिली. त्यांच्या भाषणात शेतकऱ्यांप्रती मनःपूर्वक कृतज्ञतेसह भारतीय कृषी क्षेत्राच्या भविष्यासाठीचा सुस्पष्ट आराखडा यांचा समन्वय दिसून आला.पंतप्रधान मोदी यांचे 79 व्या स्वातंत्र्यदिनाचे भाषण: विकसित भारत 2047 साठी एक दृष्टीकोन
August 15th, 11:58 am
79 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्ल्यावरून तब्बल 103 मिनिटांचे त्यांचे सर्वात मोठे आणि सर्वात निर्णायक भाषण दिले, ज्यामध्ये त्यांनी 2047 पर्यंत विकसित भारताच्या उभारणीसाठी एक धाडसी आराखडा मांडला. स्वयंपूर्णता , नवोन्मेष आणि नागरिक सक्षमीकरणावर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करून, पंतप्रधानांनी इतर देशांवर अवलंबून असलेला देश ते जागतिक स्तरावरचा प्रचंड आत्मविश्वास असलेला , तंत्रज्ञानदृष्ट्या प्रगत आणि आर्थिकदृष्ट्या लवचिक देश हा आतापर्यंतचा भारताचा प्रवास अधोरेखित केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात केलेल्या प्रमुख घोषणा
August 15th, 10:32 am
79व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आपल्या 12व्या स्वातंत्र्यदिन संबोधनात पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्याला भारताच्या पुढील प्रगतीच्या नव्या अध्यायाचे प्रक्षेपण केंद्र बनवले. त्यांनी अनेक धाडसी घोषणा केल्या, ज्यामुळे भारत केवळ पावले टाकणार नाही, तर भविष्याकडे झेप घेण्यास सज्ज आहे, हे स्पष्ट झाले. भारताचा पहिला सेमीकंडक्टर चिप तयार करण्यापासून ते जेट इंजिन निर्मितीपर्यंत, अणुऊर्जा क्षमता दहापट वाढवण्यापासून ते ₹1 लाख कोटींच्या युवक रोजगार योजनेपर्यंत, भारत आपले भविष्य स्वतः ठरवेल, स्वतःचे नियम घालेल आणि 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनण्याचे उद्दिष्ट साध्य करेल, असा त्यांचा संदेश स्पष्ट होता.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वातंत्र्यदिनाचे भाषण : सुधारणा, आत्मनिर्भरता आणि प्रत्येक भारतीयाच्या सबलीकरणाचा दृष्टीकोन
August 15th, 10:23 am
79 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्राला संबोधित करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या आत्मनिर्भरतेच्या आणि परिवर्तनाच्या प्रवासावर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, गेल्या दशकामध्ये भारताने रिफॉर्म (सुधारणा), परफॉर्म (कामगिरी) आणि ट्रान्सफॉर्म (परिवर्तन) हा मार्ग स्वीकारला असून आता अधिक सामर्थ्याने पुढे जाण्याची वेळ आली आहे. सरकार एक आधुनिक, कार्यक्षम आणि नागरिक-अनुकूल परिसंस्था तयार करण्यासाठी वचनबद्ध आहे, ज्यात कायदे, नियम आणि प्रक्रिया सुलभ केल्या जातील, उद्योजकतेला प्रोत्साहन दिले जाईल आणि प्रत्येक भारतीय ‘विकसित भारत’ घडवण्यात आपले योगदान देऊ शकेल.आत्मनिर्भर भारत: सशक्त आणि विकसित भारताचा पाया
August 15th, 10:20 am
79th स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत हा विकसित भारताचा एक महत्त्वाचा पाया असल्याचे अधोरेखित केले. संरक्षण, तंत्रज्ञान, ऊर्जा, अवकाश आणि उत्पादन या क्षेत्रांतील भारताच्या प्रगतीचा उल्लेख करताना त्यांनी ऑपरेशन सिंदूरचे उदाहरण दिले. आत्मनिर्भरता ही राष्ट्रीय सामर्थ्य, सन्मान आणि 2047 पर्यंत विकसित भारताच्या प्रवासाचा कणा आहे, असे त्यांनी नमूद केले.79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून केलेलं भाषण
August 15th, 07:00 am
स्वातंत्र्याचे हे महापर्व, 140 कोटी संकल्पाचे पर्व आहे. स्वातंत्र्याचे हे पर्व सामूहिक सिद्धींचे, गौरवाचे पर्व आहे. आणि हृदय अपेक्षांनी भरलेले आहे. देश एकतेच्या भावनेला सातत्याने बळकटी देत आहे. 140 कोटी देशवासीय आज तिरंग्याच्या रंगात रंगून गेले आहेत. हर घर तिरंगा... भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात, मग तो वाळवंटी भाग असो, किंवा हिमालयाची शिखरे असोत, सागर किनारे असोत, किंवा दाट लोकसंख्येचे भाग, प्रत्येक भागातून एकच आवाज घुमत आहे, एकच जयघोष आहे, आपल्या प्राणांपेक्षाही प्रिय मातृभूमीचे जयगान आहे …भारतात 79 वा स्वातंत्र्यदिन साजरा
August 15th, 06:45 am
79 व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधित करताना घटना समिती, स्वातंत्र्यसैनिक आणि संविधान निर्मात्यांना आदरांजली वाहिली. भारत नेहमीच आपल्या शेतकरी, पशुपालक आणि मच्छिमारांच्या हिताचे रक्षण करेल याचा त्यांनी पुनरुच्चार केला. 2047 पर्यंत विकसित भारत साध्य करण्याच्या उद्देशाने GST सुधारणा, प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना, राष्ट्रीय क्रीडा धोरण आणि सुदर्शन चक्र मिशन या प्रमुख उपक्रमांवर त्यांनी प्रकाश टाकला. पंचायत सदस्य आणि ड्रोन दीदी सारख्या विशेष अतिथींनी लाल किल्ल्यावरील सोहळ्याला हजेरी लावली.