इकॉनॉमिक टाईम्स वर्ल्ड लीडर्स फोरममधील पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर
August 23rd, 10:10 pm
येथे जागतिक परिस्थिती, भू-अर्थशास्त्र यावर सविस्तर चर्चा झाली आहे आणि जेव्हा आपण जागतिक संदर्भात पाहतो तेव्हा आपल्याला भारताच्या अर्थव्यवस्थेची ताकद लक्षात येते. आज भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था आहे. आपण लवकरच जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहोत. तज्ज्ञ म्हणत आहेत की जागतिक विकासात भारताचे योगदान लवकरच सुमारे 20 टक्के असणार आहे. ही वाढ, ही लवचिकता, जी आपण भारताच्या अर्थव्यवस्थेत पाहत आहोत, ती गेल्या दशकात भारताने मिळवलेल्या स्थूल-आर्थिक स्थिरतेमुळे आहे. आज आपली राजकोषीय तूट 4.4% पर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे. आणि हे असे घडत आहे जेव्हा आपण कोविडच्या इतक्या मोठ्या संकटाचा सामना केला आहे. आज आपल्या कंपन्या भांडवली बाजारातून विक्रमी निधी उभारत आहेत. आज आपल्या बँका पूर्वीपेक्षा अधिक मजबूत आहेत. महागाई खूप कमी आहे, व्याजदर कमी आहेत. आज आपली चालू खात्यातील तूट नियंत्रणात आहे. परकीय चलन साठा देखील खूप मजबूत आहे. इतकेच नाही तर दरमहा लाखो देशांतर्गत गुंतवणूकदार एस.आय.पी. द्वारे बाजारात हजारो कोटी रुपये गुंतवत आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली इथे आयोजित इकॉनॉमिक टाइम्स वर्ल्ड लीडर्स फोरमला केले संबोधित
August 23rd, 05:43 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली इथे इकॉनॉमिक टाइम्स वर्ल्ड लीडर्स फोरमला संबोधित केले. यावेळी पंतप्रधानांनी वर्ल्ड लीडर्स फोरमसाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर पाहुण्यांचे स्वागतही केले. हा उपक्रम अतिशय योग्य वेळी आयोजित केला असल्याचेही त्यांनी नमूद केले, आणि त्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांनी आयोजकांची प्रशंसाही केली. मागच्या आठवड्यातच आपण लाल किल्ल्यावरून पुढच्या पिढीच्या सुधारणांबद्दल (नेक्स्ट जनरेशन रिफॉर्म्स) भाषण केले होते आणि हा मंच त्याच भावनेला अधिक बळ देत आहे, असे त्यांनी सांगितले.बिहारमध्ये मधुबनी इथे राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम आणि विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
April 24th, 12:00 pm
माझे भाषण सुरू करण्यापूर्वी, मी तुम्हा सर्वांना एक विनंती करू इच्छितो, तुम्ही जिथे कुठे असाल तिथे, आपल्या जागेवर बसल्या बसल्याच, उभे राहण्याची आवश्यकता नाही, बसल्या बसल्याच 22 तारखेला ज्या कुटुंबातल्या सदस्यांना आपण गमावले आहे, त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी काही क्षण आपल्या जागेवर बसल्या बसल्याच, मौन बाळगत, आपल्या आराध्य देवतांचे स्मरण करत, त्या सर्वांना श्रद्धांजली अर्पण करू , त्यानंतर मी आज माझे भाषण सुरू करेन.राष्ट्रीय पंचायती राज दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारमध्ये मधुबनी येथे 13,480 कोटी रुपयांहून अधिक मूल्याच्या विकासकामांचा शुभारंभ
April 24th, 11:50 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय पंचायती राज दिनानिमित्त आज बिहारमध्ये मधुबनी येथे 13,480 कोटी रुपयांहून अधिक मूल्याच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, पायाभरणी आणि लोकार्पण केले. पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या हल्ल्यात जीव गमावलेल्या लोकांसाठी मौन पाळून श्रद्धांजली वाहण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले. त्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की पंचायती राज दिनानिमित्त संपूर्ण देश मिथिला आणि बिहारशी जोडला गेला आहे. बिहारच्या विकासाचे उद्दिष्ट असलेल्या हजारो कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन तसेच पायाभरणी झाली आहे असे सांगून पंतप्रधानांनी वीजनिर्मिती, रेल्वे तसेच पायाभूत सुविधा क्षेत्रांतील या उपक्रमांमुळे बिहारमध्ये रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील हे आवर्जून नमूद केले. महान कवी आणि राष्ट्रीय पातळीवरील सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व असलेल्या रामधारी सिंह दिनकर जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त मोदी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनी द्वारे संपर्क साधला
April 16th, 05:45 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फिनलँड चे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांच्याशी दूरध्वनी द्वारे संवाद साधला.Today, we champion the Act East Policy, driving forward the region's development: PM Modi in Agartala
April 17th, 05:22 pm
In Agartala, Tripura, Prime Minister Narendra Modi electrified the crowd ahead of the 2024 Lok Sabha Elections. With unwavering zeal, he unveiled the Viksit vision for the North East, promising growth encapsulated in BJP’s Sankalp Patra. Emphasizing the region's integral role in the nation, PM Modi reaffirmed the commitment to uplift the North East, resonating deeply with the people of Tripura.PM Modi addresses a dynamic crowd at a public meeting in Agartala, Tripura
April 17th, 01:45 pm
In Agartala, Tripura, Prime Minister Narendra Modi electrified the crowd ahead of the 2024 Lok Sabha Elections. With unwavering zeal, he unveiled the Viksit vision for the North East, promising growth encapsulated in BJP’s Sankalp Patra. Emphasizing the region's integral role in the nation, PM Modi reaffirmed the commitment to uplift the North East, resonating deeply with the people of Tripura.Our Sankalp Patra is a reflection of the young aspirations of Yuva Bharat: PM Modi at BJP HQ
April 14th, 09:02 am
Releasing the BJP Sankalp Patra at Party headquarters today, PM Modi stated, The entire nation eagerly awaits the BJP's manifesto. There is a significant reason for this. Over the past 10 years, the BJP has implemented every point of its manifesto as a guarantee. The BJP has once again demonstrated the integrity of its manifesto. Our Sankalp Patra empowers 4 strong pillars of developed India - Youth, women, poor and farmers.”PM Modi delivers key address during BJP Sankalp Patra Release at Party HQ
April 14th, 09:01 am
Releasing the BJP Sankalp Patra at Party headquarters today, PM Modi stated, The entire nation eagerly awaits the BJP's manifesto. There is a significant reason for this. Over the past 10 years, the BJP has implemented every point of its manifesto as a guarantee. The BJP has once again demonstrated the integrity of its manifesto. Our Sankalp Patra empowers 4 strong pillars of developed India - Youth, women, poor and farmers.”Congress-DMK has deprived the SC-ST-OBC for decades: PM Modi in Mettupalayam
April 10th, 03:00 pm
Addressing a rally in Mettupalayam, Prime Minister Narendra Modi said, “Congress-DMK has deprived the SC-ST-OBC for decades”. He added that the I.N.D.I have never trusted the potential of the people of India. He said that even during the COVID pandemic, India’s MSMEs were provided with support of more than Rs. 2 lakh crores.Massive crowd support in Vellore & Mettupalayam as PM Modi addresses two public meetings in Tamil Nadu
April 10th, 10:30 am
Ahead of the Lok Sabha elections, Prime Minister Narendra Modi was accorded a warm welcome by the massive crowd support in Vellore and Mettupalayam as he addressed two public meetings in Tamil Nadu. He said, I bow down to the history, mythology, and bravery of Vellore. He added, Vellore created a pivotal revolution against the British, and presently, its robust support for the N.D.A. showcases the spirit of 'Fir ek Baar Modi Sarkar'.नवी दिल्लीतील करिअप्पा संचलन मैदान येथे एनसीसी छात्रसैनिकांच्या रॅलीला पंतप्रधानांनी केलेले मार्गदर्शन
January 27th, 05:00 pm
केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, राजनाथ सिंह जी, अजय भट्ट जी, तिन्ही दलांचे प्रमुख, सीडीएस जनरल अनिल चौहान जी, संरक्षण सचिव, एनसीसीचे महासंचालक , सर्व अतिथी आणि एनसीसीचे माझे तरुण मित्रांनो...पंतप्रधानांनी करिअप्पा परेड ग्राउंड, दिल्ली येथे एनसीसी पीएम रॅलीला केले संबोधित
January 27th, 04:30 pm
उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की ते स्वत: एनसीसीचे माजी छात्रसैनिक असल्यामुळे एनसीसी कॅडेट्सबरोबर उपस्थित असताना त्या आठवणी जाग्या होणे स्वाभाविक आहे. “एनसीसी कॅडेट्सबरोबर उपस्थित राहताना एक भारत श्रेष्ठ भारत’ची प्रचिती येते”, असे सांगत पंतप्रधान म्हणाले की देशाच्या विविध भागांतील छात्रसैनिक इथे उपस्थित असल्याचे त्यांना आढळले आहे. एनसीसीची व्याप्ती सातत्याने वाढत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला आणि आजचा हा प्रसंग एक नवीन सुरुवात असल्याचे नमूद केले. व्हायब्रंट व्हिलेज योजनेंतर्गत सरकार विकसित करत असलेल्या सीमावर्ती भागातील गावांचे 400 हून अधिक सरपंच आणि देशभरातील बचत गटांमधील 100 हून अधिक महिला इथे उपस्थित असल्याचे त्यांनी नमूद केले .सातव्या इंडिया मोबाईल काँग्रेसच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
October 27th, 10:56 am
सातव्या इंडिया मोबाईल काँग्रेसच्या या उद्घाटन प्रसंगी आपल्या सर्वांची भेट होणे हा माझ्यासाठी एक सुखद अनुभव आहे. 21 व्या शतकात वेगाने बदलणाऱ्या जगात या कार्यक्रमात कोट्यवधी लोकांचे भाग्य बदलण्याची क्षमता आहे. एक काळ होता जेव्हा आपण भविष्याच्या गोष्टी करत असू, तर त्याचा अर्थ पुढचे दशक, किंवा 20-30 वर्षांनंतरचा काळ, किंवा मग पुढचे शतक असा असायचा. मात्र, आज प्रत्येक दिवशी तंत्रज्ञानात वेगाने होत जाणाऱ्या परिवर्तनामुळे आपण म्हणतो, ‘भविष्य आता इथेच अवतरले आहे.’पंतप्रधानांच्या हस्ते सातव्या भारत मोबाईल काँग्रेस(आयएमसी) चे उद्घाटन
October 27th, 10:35 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत भारत मंडपम येथे सातव्या भारत मोबाईल काँग्रेस 2023 संमेलनाचे उद्घाटन केले. भारत मोबाईल काँग्रेस (आयएमसी) या आशियातील सर्वात मोठ्या दूरसंचार, माध्यमे आणि तंत्रज्ञानविषयक मंचाचे ‘जागतिक डिजिटल नवोन्मेष’ या संकल्पनेवर आधारित संमेलन 27 ते 29 ऑक्टोबर 2023 या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. महत्त्वाच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील विकासक, उत्पादक आणि निर्यातक म्हणून भारताचे स्थान बळकट करणे हे या आयएमसी2023 च्या आयोजनाचे उद्दिष्ट आहे. या कार्यक्रमात पंतप्रधानांनी देशभरातील शैक्षणिक संस्थांना शंभर ‘5जी युज केस प्रयोगशाळां’ची देणगी दिली.देशाच्या कानाकोपऱ्यात अत्याधुनिक तंत्रज्ञान आणण्यास केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचा पंतप्रधानांचा पुनरुच्चार
August 02nd, 11:46 pm
भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत अत्याधुनिक तंत्रज्ञान आणण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे, असा पुनरुच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. देशातील अनेक जिल्ह्यांमधे तीन लाखांपेक्षा जास्त ठिकाणी, 5-जी सेवेची यशस्वी स्थापना होणे, ही घटना भारताच्या तंत्रज्ञान प्रवासातील मैलाचा दगड ठरली आहे, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.महाराष्ट्रातील पुणे येथे विविध प्रकल्पांच्या पायाभरणी आणि उद्घाटनावेळी पंतप्रधानांनी केलेले भाषण
August 01st, 02:00 pm
खरंच, भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत पुण्याचे मोठे योगदान आहे. पुण्याने बाळ गंगाधर टिळक यांच्यासह अनेक क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक देशाला दिले आहेत. आजच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती सुद्धा आहे. आपल्या सर्वांसाठी हा दिवस खूपच खास आहे. अण्णा भाऊ साठे महान समाज सुधारक होते. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी ते भारलेले होते. आजही मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि अभ्यासक त्यांच्या साहित्यावर संशोधन करतात. अण्णाभाऊ साठे यांचे कार्य, त्यांचे आदर्श आजही आपल्या सर्वांसाठी प्रेरणास्रोत आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील पुणे येथे विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केले
August 01st, 01:41 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेट्रो रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून पुणे मेट्रोच्या पूर्ण झालेल्या विभागाचे लोकार्पण केले. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेद्वारे बांधण्यात आलेली 1,280 हून अधिक घरे आणि पुणे महापालिकेने बांधलेली 2,650 हून अधिक घरे देखील पंतप्रधानांच्या हस्ते लाभार्थ्यांना हस्तांतरित करण्यात आली. त्यांनतर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेद्वारे बांधण्यात येणार्या सुमारे 1,190 घरांची आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून बांधण्यात येणाऱ्या 6,400 हून अधिक घरांची पायाभरणी देखील पंतप्रधानांच्या हस्ते झाली. पिंपरी चिंचवड महानगरपालिका (पीसीएमसी) अंतर्गत सुमारे 300 कोटी रुपये खर्चून विकसित करण्यात आलेल्या कचऱ्यापासून ऊर्जा निर्माण करणाऱ्या (वेस्ट टू एनर्जी) संयंत्राचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झाले.जागतिक पर्यावरण दिन 2023 निमित्त पंतप्रधानांचा व्हिडिओ संदेश
June 05th, 03:00 pm
जागतिक पर्यावरण दिनाच्या तुम्हा सर्वांना, देशभरातील आणि जगभरातील नागरिकांना खूप खूप शुभेच्छा. यंदाच्या पर्यावरण दिनाची संकल्पना एकल वापराच्या प्लास्टिकपासून मुक्ती मिळवण्याचे अभियान ही आहे. आणि मला आनंद आहे की आज जग ज्याबाबत बोलत आहे त्यावर भारत गेली 4-5 वर्षे सातत्याने काम करत आहे. 2018 मध्येच, भारताने एकदा वापरल्या जाणार्या प्लास्टिकपासून मुक्त होण्यासाठी दोन स्तरांवर काम करण्यास सुरुवात केली होती. एकीकडे आम्ही एकल वापराच्या प्लास्टिकवर बंदी घातली आहे आणि दुसरीकडे प्लास्टिक कचऱ्यावर प्रक्रिया करणे अनिवार्य करण्यात आले आहे. यामुळे, भारतात सुमारे 30 लाख टन प्लास्टिक पॅकेजिंगचा पुनर्वापर करणे अनिवार्य झाले आहे. भारतात दरवर्षी निर्माण होणाऱ्या एकूण प्लास्टिक कचऱ्याच्या 75 टक्के हे प्रमाण आहे. आणि आज सुमारे 10 हजार उत्पादक, आयातदार आणि ब्रँड मालक त्याच्या कक्षेत आले आहेत.पंतप्रधानांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित बैठकीला व्हिडीओ संदेशाद्वारे केले संबोधित
June 05th, 02:29 pm
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज आयोजित केलेल्या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित केले.