भारतात पायाभूत सुविधा क्षेत्रातील क्रांतीची 11 वर्षे अधोरेखित केली
June 11th, 10:17 am
गेले दशकभराहून अधिक काळ देशाला समृद्धीच्या वाटेने नेणाऱ्या 11 वर्षांतील पायाभूत सुविधा क्षेत्रातील क्रांतीचा उत्सव साजरा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या विकास यात्रेतील महत्त्वाचा टप्पा अधोरेखित केला आहे. सुधारित जोडणी सुविधा, आर्थिक विस्तार आणि नागरिकांसाठी अधिक सुलभ जीवनमान तसेच वाढीव समृद्धी प्राप्त करून देणाऱ्या रेल्वे, महामार्ग, बंदरे आणि विमानतळ अशा सर्व क्षेत्रांमधील पायाभूत सुविधा क्षेत्रात भारताने घेतलेल्या प्रचंड भरारीवर पंतप्रधान मोदी यांनी अधिक भर दिला.