देश आत्मनिर्भरतेला बळकटी देत असल्याने, युवा प्रणीत तंत्रज्ञान नवोन्मेषाचे पंतप्रधानांनी केले कौतुक

June 12th, 10:00 am

तंत्रज्ञानाची प्रगती आणि देशाच्या आत्मनिर्भरतेला चालना देण्यामध्ये बजावत असलेल्या मध्यवर्ती भूमिकेबद्दल भारताच्या युवा नवोन्मेषकर्त्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. गेल्या 11 वर्षात नवोन्मेषाचा वापर करण्यासाठी डिजिटल इंडियाने युवा वर्गाला सक्षम केले आहे, ज्यामुळे तंत्रज्ञानसंपन्न केंद्र असे भारताचे स्थान आणखी भक्कम झाले आहे.