उत्तर प्रदेशातील राष्ट्रीय महामार्ग-19 आणि वाराणसी रिंग रोड दरम्यान NH (O) अंतर्गत 14447.64 कोटी रुपयांच्या एकूण भांडवली खर्चासह 'हायब्रिड ॲन्युइटी मॉडेल' नुसार 6 पदरी 'ग्रीनफील्ड' उन्नत मार्गिका, रॅम्प्स/लूप्स आणि पादचारी पुलाच्या विकासाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

July 15th, 04:53 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने आज उत्तर प्रदेशातील वाराणसी शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी, राष्ट्रीय महामार्ग-19 आणि वाराणसी रिंग रोड दरम्यान एका 'लिंक/कनेक्टर कॉरिडॉर'च्या विकासाला मंजुरी दिली आहे. याद्वारे गंगा नदीच्या किनाऱ्यालगत कनेक्टिव्हिटी साधली जाईल. 46.039 किमी लांबीच्या या प्रकल्पामध्ये सहा-पदरी उन्नत मुख्य मार्ग, एक शानदार 'केबल-स्टेड' पूल, 'एक्स्ट्राडोज्ड' पादचारी पूल-सह-प्रमुख पूल (Foot Over Bridge-cum-Major Bridge), लूप्स, रॅम्प्स, लिंक रोड आणि सर्व्हिस रोड यांचा समावेश आहे. हा प्रकल्प 'हायब्रिड ॲन्युइटी मॉडेल' अंतर्गत आणि NH(O) योजनेद्वारे एकूण 14,447.64 कोटी रुपयांच्या भांडवली खर्चासह पूर्ण केला जाईल. या खर्चात 6,037.85 कोटी रुपयांचा स्थापत्य बांधकाम खर्च (ज्यात युटिलिटी शिफ्टिंगचा समावेश आहे, परंतु जीएसटीचा समावेश नाही) आणि 541.11 कोटी रुपयांचा भूसंपादन खर्च समाविष्ट आहे.

उत्तर प्रदेशात वरुणा नदीच्या काठावर 6/4 पदरी उन्नत मार्गिका आणि त्याचे रॅम्प/ वर्तुळाकार वळण रस्त्यांच्या विकासाला, 'हायब्रिड ॲन्युइटी मॉडेल' (Hybrid Annuity Model) अंतर्गत आणि एकूण भांडवली खर्चासह 10,998.32 कोटी रुपये खर्चाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

July 15th, 04:47 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने आज, उत्तर प्रदेशातील वाराणसी शहरात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग क्र. 31 आणि वरुणा नदीच्या काठाने जाणारा वाराणसी रिंग रोड याना जोडणाऱी 43.218 किलोमीटर लांबीची मार्गिका विकसित करण्यासाठी मंजुरी दिली आहे. या प्रकल्पामध्ये प्रामुख्याने 6/4 पदरी उन्नत मार्गिकांचा समावेश असून, यात, मुख्य रस्ता, उड्डाणपूल, वळण मार्ग, रॅम्प आणि सेवा रस्त्यांचा समावेश आहे. हा प्रकल्प ‘भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणा’मार्फत, हायब्रिड ॲन्युइटी मॉडेल' (HAM) अंतर्गत राबवण्यात येईल. या प्रकल्पाचा एकूण भांडवली खर्च 10,998.32 कोटी रुपये इतका असून, यामध्ये 4,565.33 कोटी रुपयांचा स्थापत्य बांधकाम खर्च आणि 934.91 कोटी रुपयांच्या भूसंपादन खर्चाचा समावेश आहे.

The BJP-NDA government is making women self-reliant and giving them leadership in building a developed India: PM Modi in Varanasi

April 28th, 05:30 pm

PM Modi participated in the Mahila Sammelan and launched multiple development projects in Varanasi. Addressing a large gathering of Nari Shakti, he spoke about the goal of implementing reservation for women in the Lok Sabha and state assemblies. Highlighting that women’s welfare has been a top priority in the government’s policies, he reiterated that the BJP-NDA government is making women self-reliant and giving them leadership in building a developed India.

पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी येथे महिला संमेलनात झाले सहभागी, सुमारे 6,350 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे केले उद्घाटन आणि पायाभरणी

April 28th, 05:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसी येथे एका संमेलनात महिलांच्या भव्य मेळाव्याला संबोधित केले. यावेळी त्यांनी हजारो कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली.

Hosting a national volleyball competition is an important step in placing Kashi on India’s sporting map: PM Modi

January 04th, 01:00 pm

PM Modi inaugurated the 72nd National Volleyball Tournament in Varanasi via video conferencing, welcoming players from 28 states and showcasing the spirit of Ek Bharat, Shreshtha Bharat. He highlighted Varanasi’s deep-rooted sporting tradition and expressed confidence that players would feel the city’s enthusiasm, support, and renowned hospitality during the championship.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे वाराणसी येथे 72व्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे केले उद्घाटन

January 04th, 12:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 72व्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन केले. या प्रसंगी मोदी यांनी वाराणसीचे खासदार म्हणून सर्व खेळाडूंचे स्वागत करताना आणि त्यांचे अभिनंदन करताना होणारा विशेष आनंद व्यक्त केला. राष्ट्रीय व्हॉलीबॉल अजिंक्यपद स्पर्धा आजपासून वाराणसीमध्ये सुरू होत असल्याचे त्यांनी घोषित केले. सर्व खेळाडू प्रचंड मेहनतीनंतर या राष्ट्रीय स्पर्धेत पोहोचले आहेत आणि येत्या काही दिवसांत वाराणसीच्या मैदानावर त्यांच्या प्रयत्नांची कसोटी लागणार आहे, असे पंतप्रधान म्हणाले . देशातील 28 राज्यांचे संघ येथे एकत्र आले असून यामधून 'एक भारत, श्रेष्ठ भारत'चे सुंदर चित्र सादर होत आहे, असे त्यांनी नमूद केले. पंतप्रधानांनी स्पर्धेमधील सर्व सहभागींचे स्वागत केले व त्यांना शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 4 जानेवारी रोजी वाराणसीमध्ये 72व्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे करणार उद्घाटन

January 03rd, 02:41 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 4 जानेवारी 2026 रोजी दुपारी 12 वाजता दूरदृश्य प्रणालीमार्फत 72व्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन करणार आहेत. वाराणसी येथील डॉ. संपूर्णानंद क्रीडा स्टेडियममध्ये हा उद्घाटन समारंभ होणार आहे.

वाराणसीहून चार वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवताना पंतप्रधानांनी केलेले भाषण

November 08th, 08:39 am

उत्तर प्रदेशचे उर्जावान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी आणि विकसित भारताचा मजबूत पाया रचण्यासाठी आज तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात होत असलेल्या उत्कृष्ट कामाचे नेतृत्व करणारे अश्विनी वैष्णव जी, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या कार्यक्रमात आपल्यासोबत एर्नाकुलम इथून सहभागी झालेले केरळचे राज्यपाल श्री राजेंद्र आर्लेकर जी, केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी सुरेश गोपी जी, जॉर्ज कुरियन जी, केरळमधील या कार्यक्रमात उपस्थित असलेले इतर सर्व मंत्री आणि लोकप्रतिनिधी, फिरोजपूर इथून जोडले गेलेले केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी आणि पंजाबचे नेते रवनीत सिंग बिट्टू जी, तेथे उपस्थित असलेले सर्व लोकप्रतिनिधी, लखनौ इथून जोडले गेलेले उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक जी, इतर मान्यवर आणि काशीतील माझे कुटुंबीय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीहून चार नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना दाखवला हिरवा झेंडा

November 08th, 08:15 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून चार नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. देशाच्या आधुनिक रेल्वे पायाभूत सुविधांचा विस्तार करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले आणि बाबा विश्वनाथांचे पवित्र शहर असलेल्या वाराणसीतील सर्व कुटुंबांना आदरपूर्वक शुभेच्छा दिल्या. देव दिवाळीच्या काळात झालेल्या अद्वितीय उत्सवाचे त्यांनी कौतुक केले आणि आजचा दिवसदेखील एक शुभ प्रसंग असल्याचे सांगितले. विकासाच्या या उत्सवासाठी त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॉरिशसच्या पंतप्रधानांसोबत संयुक्त पत्रकार परिषदेमध्‍ये प्रसारमाध्‍यमांच्या प्रतिनिधींना दिलेले निवेदन

September 11th, 12:30 pm

आपली संस्कृती आणि संस्कार, अनेक शतकांपूर्वीपासून भारतातून मॉरिशसमध्ये पोहोचले आहेत आणि तिथल्या जीवनाच्या प्रवाहात स्थायिक झाले आहेत. काशीमधल्या गंगेच्या अखंड, अविरत प्रवाहाप्रमाणे, भारतीय संस्कृतीचा अखंड प्रवाह मॉरिशसला समृद्ध करत आहे. आणि आज,आपण काशीमध्ये मॉरिशसमधील मित्रांचे, स्नेहींचे स्वागत करत आहोत, ही केवळ औपचारिकता नाही; तर एक आत्मिक मिलन आहे. म्हणूनच मी अभिमानाने म्हणतो की, भारत आणि मॉरिशस हे केवळ भागीदार नाहीत, तर एक कुटुंब आहे.